◻ आश्वी परिसरातील ३० गावे कोरोनाच्या मगरमिठ्ठीत.
◻ आश्वी बुद्रुकचे संक्रमन थांबता थांबेना ; उंबरी बाळापूर व चिचंपूरचा ही आकडा वाढला.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील आश्वी परिसरातील गावे ही नागरीकाच्या निश्काळजीपणामुळे कोरोनाच्या मगरमिठ्ठीत दिवसेंदिवस अधिक अडकत चालली आहे. परिसरातील आश्वी बुद्रुक येथे आतापर्यत १११, चिचंपूर येथे ५७ व उंबरी बाळापूर येथे ४६ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने या गावानमध्ये कोरोनाने थैमान घातल्याचे चित्र असून आश्वी परिसरातील तब्बल ३० गावे कोरानाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील १५९ बाधीत गावाची २६ नोव्हेंबर पर्यतची सविस्तर आकडेवारी..
तालुक्यातील शहरी भागात आतापर्यत १ हजार ४०३ बाधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी १ हजार ३०४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३ बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे, सध्या शहरी भागातील ८६ रुग्णावर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील नागरीकाच्या निश्काळजीपणामुळे आतापर्यत घुलेवाडी येथे ३४४, गुंजाळवाडी येथे २७३, जोर्वे येथे १२१, निमोण येथे ११४ व आश्वी बुद्रुक येथे १११ इतके मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरीकासह, व्यापारी, लहान मोठे व्यावसायिक व भाजीपाला विक्रेत्यामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
आजपर्यत आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक येथे १११, चिचंपूर येथे ५७, उंबरी बाळापूर येथे ४६, रहिमपूर येथे ४४, कनोली येथे ४४, आश्वी खुर्द येथे ४३, प्रतापपूर येथे ४३, निमगावजाळी येथे ४०, शेडगाव येथे ३०, मनोली येथे २६, हंगेवाडी येथे, २४, ओझर खुर्द येथे २०, शिबलापूर येथे १९, खळी येथे १८, औरंगपूर येथे १३, सादतपूर येथे १२, पिप्रीं येथे ११, चणेगाव येथे ६, डिग्रंस येथे ६, मालुंजे येथे ६, दाढ बुद्रुक येथे ५, दाढ खुर्द येथे ५, पानोडी येथे ५, मांचीहिल येथे ५, कोचीं येथे ४, ओझर बुद्रुक येथे ४, कणकापूर येथे ४, वरंवडी येथे ४, खांबे येथे ३ व झरेकाठी येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. (८ महिन्याची आकडेवारी)
तसेच तालुक्यातील आंबी खालसा येथे १७, आंबी दुमाला येथे १४, अंभोरे येथे १०, अभाळवाडी येथे १, अकलापूर येथे २१, बोटा येथे ५३, भोजदरी येथे ५, बोरबन येथे ५, बिरेवाडी येथे २, चदंणापूरी येथे ९८, चिताळवेढे येथे १, चिकणी येथे ३१, चिखली येथे ५१, चिचोंली गुरव येथे २२, चोर कौठे येथे २, दरेवाडी येथे ३, देवगाव येथे २, देवकौठे येथे २२, धानोरी येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे २३, धादंरफळ खुर्द येथे २२, डोळासणे येथे ६, डोगरगाव येथे २, ढोलेवाडी येथे ४३, घारगाव येथे ४३, गणोरे येथे १, गुंजाळवाडी पठार येथे ५, हिवरगाव पठार येथे ७, हिवरगाव पावसा येथे ४९, जाचकवाडी येथे १, जाखोरी येथे ६, जांबुत खुर्द येथे ६, जवळे बाळेश्वर येथे ८,
जवळे कडलग येथे २१, काकडवाडी येथे १, कर्जुले पठार येथे १, कऱ्हे येथे ११, करुले येथे ३, कासार दुमला येथे ४५, कसारे येथे २, कौठे खुर्द येथे ८, कौठे बुद्रुक येथे ३९, कौठे धादंरफळ येथे ३३, कवठे कमळेश्वर येथे ६, कौठे मलकापूर येथे ३, केळेवाडी येथे ७, खांडगाव येथे २४, खांदरेवाडी येथे ३, खाजांपूर येथे ६, खराडी येथे २७, कोकणगाव येथे १९, कोल्हेवाडी येथे ३७, कोळवाडे येथे ६, कुरण येथे ६३, कुरकुटवाडी येथे ३३, कुरकुडी येथे १५, लोहारे येथे ४,
मालदाड येथे १६, माळवाडी येथे १, माळेगाव पठार येथे ४, माळेगाव हवेली येथे १०, मांडवे बुद्रुक येथे ४, मंगळापूर येथे ३८, मेढंवन येथे ११, म्हसंवडी येथे ३, मिरपूर येथे १, मिर्झापूर येथे ६, मोधळवाडी येथे २, मुंजेवाडी येथे २, नादुंर खदारमाळ येथे २५, नादुंरी दुमाला येथे २५, नान्नज येथे ५, नान्नज दुमाला येथे ९, निळंवडे येथे ८, निम्मज येथे १०, निभाळे येथे ८, निमगाव खुर्द येथे ११, निमगाव बुद्रुक येथे १६, निमगाव भोजापूर येथे १९, निमगाव टेभीं येथे २६, निमगाव पागा येथे २२, पळसखेडे येथे १४, पेमरेवाडी येथे ५, पेमगिरी येथे २९, पिपंळे येथे २५, पिपळगाव देपा येथे १८, पिपळगाव कोझिंरा येथे २३, पिपळगाव माथा येथे १, पिपंरणे येथे २६, पोखरी हवेली येथे ५, पोखरी बाळेश्वर येथे ७, राजापूर येथे ७८, रायतेवाडी येथे ३०, रायते येथे २७, साकुर येथे ५२, समनापूर येथे ३९,
संगमनेर खुर्द येथे ५५, सागंवी येथे १०, सारोळे पठार येथे ३१, सावरगाव घुले येथे ८, सावरचोळ येथे १, सावरगाव तळ येथे २९, सायंखिडी येथे १४, शेळकेवाडी येथे ३, शेडेवाडी येथे १, शिदोंडी येथे ३, शिरापूर येथे २, शिरसगाव धुपे येथे १, शिवापूर येथे १, सोनेवाडी येथे ६, सोनुशी येथे ७, सुकेवाडी येथे ५८, तळेगाव दिघे येथे ५५, तिगाव येथे ५, वडगावपान येथे ५४, वरंवडी पठार येथे ९, वेल्हाळे येथे २८, वनकुटे येथे १४, वडगाव लाडंगा येथे २५, वडझरी येथे २, वाघापूर येथे १४, येलकोप येथे १ व झोळे येथे ३७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. (८ महिन्याची आकडेवारी)
दरम्यान २६ नोव्हेंबर पर्यत संगमनेर तालुक्यात २६ हजार ५८२ जणाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ७५ जण हे कोरोना बाधीत म्हणून आढळले आहेत. आतापर्यत तालुक्यातील ४ हजार ७५३ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.६६ टक्के ऐवढे आहे. तर आतापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे ४३ जणाचा मृत्यू झाला असून मृत्यू दर हा अवघा ०.८५ टक्के एवढा आहे. सध्या बाधीत व्यक्तीमधील २७९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेचं बाधीत रुग्णामध्ये शहरी भागातील १ हजार ४०३ तर ग्रामीण भागातील ३ हजार ६७२ कोरोना बाधीत रुग्णाचा समावेश आहे.
***टिप :- वरील संपूर्ण माहिती ही लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसापासून ते २६ नोव्हेंबर २०२० अखेर पर्यतची (८ महिन्याची) असल्याची वाचकानी नोंद घ्यावी.