◻ आश्वी परिसरातील तब्बल ५ गावात आज पुन्हा बाधीत रुग्ण.
संगमनेर Live | शुक्रवार (२७ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, चिचंपूर, मांचीहिल व प्रतापपूर या पाच गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
शुक्रवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहरी भागात १०, उंबरी बाळापूर येथे ४, आश्वी बुद्रुक येथे ५, चिचंपूर येथे २, प्रतापपूर येथे १, मांचीहिल येथे १, केळेवाडी येथे १, पिपंरणे येथे २, चंदनापूरी येथे ३, गुंजाळवाडी येथे १, कासार दुमला येथे ४, जोर्वे येथे १, नान्नज दुमाला येथे १, कोल्हेवाडी येथे १, घुलेवाडी येथे १, चिखली येथे १ व राजापूर येथे १ असे एकून ४० कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, चिचंपूर, प्रतापपूर व मांचीहिल या पाच गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोना आजारापासून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी नागरीकानी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन करणे तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.