◻ शहर व आश्वी परिसरातील गावासह तालुक्यात तब्बल ५० बाधीत रुग्णाची भर.
संगमने Live | गुरुवार (१९ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ५० कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे गुरुवार हा संगमनेर तालुक्यासाठी घातवार ठरला आहे. आज शहरी भागासह आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, प्रतापपूर, रहिमपूर, निमगावजाळी व दाढ बुद्रुक या गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
******
गुरुवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर १८, आश्वी बुद्रुक येथे ६, उंबरी बाळापूर येथे ४, प्रतापपूर येथे १, रहिमपूर येथे १, निमगावजाळी येथे १, दाढ बुद्रुक येथे १, जोर्वे येथे २, कोल्हेवाडी येथे १, खांडगाव येथे १, वडगाव लांडगा येथे २, निमगाव भोजापूर येथे २, कोंची येथे १, पळसखेडे येथे २, कोकणगाव येथे १, गुंजाळवाडी येथे ३, पिपळगाव कोझिंरा येथे २ व निमज येथे १ असे एकून ५० कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
*******
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, प्रतापपूर, रहिमपूर, निमगावजाळी व दाढ बुद्रुक या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी सणासुदीच्या काळात या आजारापासून स्वत: चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन व प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.