◻ पाथर्डी येथिल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा.
संगमनेर Live | गाळप सुरू होऊन एक महिना पुर्ण होत आला असून जिल्हातील कोणत्याही कारखान्याने दर जाहीर केलेला नाही. प्रादेशिक संचालक यांचे साखर कारखानदारीवर लक्ष नाही असा आरोप यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी करुन आम्ही गेल्या एक महिन्यापुर्वी प्रादेशिक संचालक अहमदनगर यांना निवेदन दिलं होते.
*******
मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचे म्हणत ऊस दर जाहिर करा.. अन्यथा तीव्र आदोंलन करु असा इशारा जिल्हाउपाध्यक्ष रमेश कचरे, पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड, बाळासाहेब फटांगरे, मेजर भोसले, भराट, युवा तालुकाध्यक्ष विवेक मोरे, उपाध्यक्ष बाबासाहेब कर्डिले आदीनी दिला आहे.
तर एकरक्कमी एफआरपी संदर्भात काय झाले.? कोणत्या कारखान्यानी किती दर दिला.? असे अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले आहे.
दरम्यान ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ सांगतो ऊस तुटल्यानंतर १४ दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने बांधून दिलेला भाव एक रकमी देणे बंधनकारक असते. आज एक महिना पुर्ण होऊनही कोणत्याही शेतकऱ्याना ऊसाचे पैसे मिळालेले नाही. आठ दिवसामध्ये ऊस दराचा तिढा सुटलानाही तर ऊसतोड बंद पाडु असा इशारा पाथर्डी येथिल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद मरकड यानी दिला आहे.