अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘ इंदिरा सन्मान कार्यक्रमाचे ’ आयोजन.

संगमनेर Live
0
भारतरत्न स्व. इंदिरा गांधी जयंतीनिमित्त कर्तुत्वान महिला व कष्टकरी महिलाचा होणार गौरव.

संगमनेर Live | स्व. इंदिरा गांधी जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महिलांचा गौरव करणाऱ्या इंदिरा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी दहा वाजता सावेडी उपनगरामध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर दिप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, तसेच विविध फ्रंटलचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे. 

इंदिरा सन्मान कार्यक्रमामध्ये समाजातील सामान्य कुटुंबातील कर्तुत्वान महिला, कष्टकरी महिला यांना सन्मानपत्र, माहेरची साडी देऊन गौरविण्यात येणार आहे. 


*******
भारतरत्न इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. एक महिला देशाच्या एवढ्या सर्वोच्च पदावरती काम करून देश चालू शकते हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले. आजही महिला स्वकर्तुत्वावर समाजामध्ये आपले स्थान निर्माण करत कुटुंब देखील चालवत असतात. 

शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी जयंतीचे औचित्य साधून अशा महिलांचा विशेष सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !