सोमवारी संगमनेर तालुक्यात ३२ कोरोना बाधीताची भर.

संगमनेर Live
0
शहराला दिलासा तर आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, प्रतापपूर व पिप्रीं गावातही आढळले रुग्ण.

संगमने Live | सोमवार (२३ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात ३२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आज शहरी भागाला दिलासा मिळाला असून आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, प्रतापपूर, पिप्रीं व निमगावजाळी या गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान रविवारी तालुक्यात २० कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते.

सोमवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर २, आश्वी बुद्रुक येथे ४, आश्वी खुर्द येथे ३, उंबरी बाळापूर येथे २, प्रतापपूर येथे २, पिप्रीं येथे २, निमगावजाळी येथे १, सावरगातळ येथे १, गुंजाळवाडी येथे ५, कौठे खुर्द येथे १, आंबी खालसा येथे २, पिपळदरी येथे १, कोल्हेवाडी येथे १, मालदाड येथे १, पिपळगाव देपा येथे १, खांडगाव येथे १, पेमगिरी येथे २ असे एकून ३२ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.

दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, प्रतापपूर, पिप्रीं व निमगावजाळी या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोना आजारापासून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन करणे तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.

टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !