संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल वेदांत लक्ष्मण पाबळ या तरुणाची नुकतीच केद्रिंय अन्न सुरक्षा व तज्ञं अधिकारी पदी निवड झाली असून या यशाबद्दल पंचक्रोशीतून वेदांत चे अभिनंदन होत आहे.
वेदांत लक्ष्मण पाबळ याचे प्राथमिक शिक्षण शिबलापूर येथिल जिल्हापरिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालय पानोडी येथे झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेर व उच्चशिक्षण हे पुणे येथून पुर्ण केले. यानंतर वेदांत ने स्पर्धा परिक्षेची तयारी करत एप्रिल २०१९ व २०२० मध्ये केद्रिंय अन्न सुरक्षा विभागाने घेतलेली परिक्षा पास केली होती. त्यामुळे १० डिसेंबर पदी वेदांत ची केद्रिंय अन्न सुरक्षा व तज्ञं अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान भारतातील सुमारे ३० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. यामध्ये संपूर्ण भारतातून ३७ तर महाराष्ट्रातून फक्त चार विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. त्यामुळे वेदांतच्या यशाबद्दल शिबलापूर पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे. सध्या वेदांत भारतीय डाक विभागात कार्यरत असून लवकरचं प्रशिक्षणासाठी रवाना होणार असल्याची माहिती वेदांत ने दिली आहे.