दोघानवर गुुुन्हा दाखल ; एकाला चौकशीसाठी घेतले ताब्यात.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे बुधवारी सकाळी एसडीपीओ कार्यालय संगमनेर व आश्वी पोलीसानी कारवाई करुन ६२ हजार ४०० रुपये किमंतीचा गुटखा जप्त केला असून एका जनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस नाईक साठे यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, एसडीपीओ कार्यालय संगमनेर व आश्वी पोलीसानी उंबरी रोडवरील मोमिनपुरा गल्लीत संगमनेर पथकातील पोलीस नाईक मालुंजकर, पोना. कडलग, पोलीस हवालदार हांडे तसेच आश्वीचे सहायक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक दिघे आदिनी अवैध गुटख्यावर कारवाई केली आहे.
यावेळी ६२ हजार ४०० रुपये किमंतीचा गुटंखा पोलीसानी जप्त केला. तर चौकशीसाठी हमिद शेख याला ताब्यात घेतल्यानतंर निमगावजाळी येथील संतोष डेगंळे याच्या मालकीचा हा माल असून त्याने आश्वी परिसरात विक्रीसाठी दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे संतोष डेगंळे व हमिद शेख यांच्या विरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात भादंवी कलम १८८, २७२, २७३, ३२८, ३४ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलम ५९, २६ (२) (IV) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी यांना तपासणी अहवाल लेखी पत्राद्वारे कळवल्यानतंर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.