◻ पाच शेतकऱ्याचे तब्बल ८ लाख रुपये नुकसान.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे रविवारी लागलेल्या अग्नीमध्ये येथिल पाच शेतकऱ्याचा तब्बल ८ एकर ऊस जळाल्याने अंदाजे ८ ते ९ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सरपंच पुंजाहरी शिदें यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास मनोली - ओझर रस्त्यालगत असलेल्या गट नंबर ३९ मधील दौलत मंगु बनवाले यांचा १ हेक्टर, बाबासाहेब मंगु बनवाले यांचा १ हेक्टर, गट नंबर ४१ मधील राजेद्रं बाळासाहेब शिदें यांचा २४ गुंठे, संजय बाळासाहेब शिदें यांचा २४ गुंठे तसेच प्रभाकर बाबुराव पराड यांचा २ एकर ऊस विजेच्या खांबावर शॉटसर्कीट झाल्याने जळाला आहे.
ऊसाला आग लागल्याची माहिती मिळताच संगमनेर कारखाण्याचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला होता. याप्रसंगी उपस्थित स्थानिक ग्रामस्थाच्या व तरुणाच्या मदतीने आग विझवण्यात आली असली तरी येथिल पाच शेतकऱ्याचे तब्बल ८ ते ९ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान महावितरणच्या विज वाहक तारामुळे झालेल्या शॉटसर्कीटमुळेचं या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थाचे म्हणने असल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना महावितरणने अर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी सरपंच पुंजाहरी शिदें, ग्रामपंचायत सदंस्य बकचंद साबळे, झुंगाराम साबळे, गणेश शेपाळ, शांताराम शिदें, पुंजाजी शिदें, शांताराम पांडे, शिवाजी शेजुळ, बाळासाहेब शिदें, शिवाजी शिदें, संजय दिवे आदिसह स्थानिक शेतकरी व ग्रामस्थं उपस्थित होते.