आश्वी परिसरातील १४ ग्रामपंचायतीचा निवडणूक बिगूल वाजला.

संगमनेर Live
0
ना. थोरात व आ. विखे पाटील याच्या गटामध्ये सत्ता संघर्षामुळे वातावरण पुन्हा तापणार.

संगमनेर Live | शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील १४ ग्रामपंयतीबरोबरचं संगमनेर तालुक्यातील तब्बल ९४ ग्रामपंचायतीचा निवडणूक बिगूल वाजल्यामुळे तालुक्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली खरी मात्र, सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया निवडणूकीनतंर होणार असल्याने सरपंच पदाची स्वप्नं पडणाऱ्या गावपुढाऱ्याचा घुसमट होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर विधानसभा निवडणूकीनतंर पुन्हा एकदा आश्वी परिसरातील १४ गावानमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्यात सत्ता संघर्ष पहावयास मिळणार असल्याने विखे व थोरात गटातील वातावरण ऐन थंडीत चागलेचं तापले आहे.

शिर्डी मतदार संघातील मुदत संपलेल्या कनोली, पिप्रीं लौकी आजमपूर, चिचंपूर खुर्द, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बुद्रुक, औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, शिबलापूर व मनोली या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकाची जोरदार तयारी निवडणूक प्रशासनाने सुरु केली आहे. १५ डिसेंबर रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार असून २३ ते ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज भरणे, ३१ डिसेंबर रोजी छाननी, ४ जानेवारी रोजी अर्ज माघारी व चिन्ह वाटप केले जाणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच निकालाची अधिसूचना २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

विधानसभा निवडणूकीनतंर आलेले कोरोना संकटामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकलत या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. हळूहळू कोरोनाचे संकट निवळू लागल्यामुळे शासनाने रेगाळलेल्या निवडणूका जानेवारी २०२१ मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आश्वी परिसरात पुन्हा एकदा कॉग्रेसचे  ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यकर्ते हे सत्ता वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी करणार असले तरी कधी नव्हे ते विखे पाटील सत्ता स्थानी नसल्यामुळे काही कार्यकर्त्यानमध्ये ऐन निवडणूकीच्या तोडावर मरगळ आल्याचे चित्र आहे. तर राज्यातील या दोन्ही दिग्गज नेत्याची ताकत व यंत्रणा कामाला लागल्यामुळे कडाक्याच्या थंडीत गावागावात वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.

विखे - थोरात ‘ समझौता एकस्प्रेस ’ ते सत्ता संघर्ष..

शिर्डी मतदार संघातील पिप्रीं लौकी आजमपूर, कनोली या दोन गावानमध्ये ना. थोरात व आ. विखे पाटील गटाची समझौता एकस्प्रेस अस्तित्वात असून चणेगाव येथे थोरात गटाकडे बहुमत असतानाही आरक्षणमुळे विखे गटाकडे सरपंचपद आहे. तर पानोडी, शिबलापूर, खळी, मनोली, कनोली, चणेगाव या ग्रामपंचायतीमध्ये आटीतटीची निवडणूक होणार असल्याने येथे सत्ता संघर्ष पाहवयास मिळणार आहे. दरम्यान होऊ घातलेल्या १४ ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायतीवर विखे गटाचे तर ३ ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे सध्या वर्चस्व आहे.

१४ ग्रामपंचायतीची स्थिती..

१) कनोली

* एकून प्रभाग    : ४

* एकून जागा     : ११

* एकून मतदान  : ३६०३

२) पिप्रीं लौकी आजमपूर

* एकून प्रभाग    : ४

* एकून जागा     : ११

* एकून मतदान  : ३५८२

३) चिचंपूर

* एकून प्रभाग    : ४

* एकून जागा     : १३

* एकून मतदान  : ४६८९

४) चणेगाव

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ९

* एकून मतदान  : २५६२

५) झरेकाठी

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ९

* एकून मतदान  : २२३९

६) पानोडी

* एकून प्रभाग    : ४

* एकून जागा     : ११

* एकून मतदान  : ३५२४

७) प्रतापपूर

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ९

* एकून मतदान  : २१३९

८) शेडगाव

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ९

* एकून मतदान  : २६४५

९) ओझर बुद्रुक

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ९

* एकून मतदान  : १६०५

१०) औरंगपूर

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ७

* एकून मतदान  : ९३२

११) खळी

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ९

* एकून मतदान  : २९०१

१२) दाढ खुर्द

* एकून प्रभाग    : ३

* एकून जागा     : ९

* एकून मतदान  : २५६६

१३) शिबलापूर

* एकून प्रभाग    : ४

* एकून जागा     : ११

* एकून मतदान  : ३०८१

१४) मनोली

* एकून प्रभाग    : ४

* एकून जागा     : ११

* एकून मतदान  : ३०८१




Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !