◻ पिप्रीं - लौकी अजमपूर पंचक्रोशीत आई व बाळाच्या मृत्यूमुळे हळहळ.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपूर येथील सौ. शितल भारत (मुकेश) मुढें (वय - २०) या महिलेचे प्रसुती दरम्यान दुर्दैवी निधन झाले असून प्रसुतीपुर्वी गर्भातच बाळ ही मृत्यू पावल्याने मुढें कुटंबावर दु:खाचा डोगर कोसळला आहे. तर आई व बाळाचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे पिप्रीं - लौकी अजमपूर पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दिवगंत सौ. शितल मुढें यांचे आष्टी (जि. बीड) हे माहेर असून पिप्रीं (ता. संगमनेर) हे सासर आहे. त्या बाळतंपणासाठी माहेरी गेल्या होत्या. रविवारी दुपारी पोटात दुखत असल्याने त्याना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. परंतू तेथील स्थानिक डॉक्टरानी त्याना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यामुळे सौ. शितल याना लोणी येथे प्रसुतीसाठी आणण्यात आले होते. मात्र आष्टी ते लोणी या प्रवासादरम्यान मोठा वेळ वाया जाऊन उशीर झाल्याने सौ. शितल याच्या बाळाचा गर्भातचं मृत्यू झाला होता.
यावेळी प्रवरा ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टरानी शर्थीचे प्रयत्नं करुन सौ. शितल याची प्रसुती केली. परंतू याकाळात अति रक्तस्त्राव झाला. यामुळे डॉक्टराचे अथक प्रयत्न तोकडे पडल्याने अखेर सौ. शितल याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान दिवगंत सौ. शितल यांच्या पश्चात पती, सासु, सासरे, दीर, भाया, आई, वडील, भाऊ, बहीनी असा मोठा परिवार असून येथिल प्रगतशिल शेतकरी रावसाहेब मुंढे याच्या सुन तर भारत मुंढे यांच्या त्या पत्नी होत. तसेच आई व बाळाच्या अकस्मात मृत्यूमुळे पिप्रीं - लौकी अजमपूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.