◻ ऊस दरापोटी २ हजार १११ रुपये चा पहिला हप्ता - रवीद्रं बिरोले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथिल पहिला खाजगी साखर कारखाना असलेल्या युटेक शुगरचा २०२०-२१ चा चतुर्थ गंळीत हंगाम जोरात सुरु झाला असून कारखाण्याचे संस्थापक रवीद्रं बिरोले यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत कारखान्याने ८३ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादक शेतकऱ्याचा विश्वास सार्थ ठरवला असल्याची माहिती कारखाण्याने दिली आहे.
साखर आयुक्ताच्या निर्देशानुसार नोव्हेंबर महिन्यात युटेक शुगरचा २०२०-२१ चा चतुर्थ ऊस गळीत हंगाम सुरु करण्यात आला होता. यावेळी रवीद्रं बिरोले यानी कारखान्याचे सर्व कामगार व ऊस उत्पादक शेतकरी याना विश्वासात घेऊन वाटचाल केल्याने अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत कारखान्याने ८३ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करत ७१ हजार क्विटलं साखरेची निर्मिती केली आहे. दैनंदिन ३५०० मेट्रीक टन ऊस गाळप क्षमता असताना १२ डिसेंबर रोजी म्हणजे एका दिवसात उच्चांकी ४३०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून कारखाना कोणत्याही व्यत्याविना पुर्णक्षमतेने सुरु आहे. यासाठी कारखाना प्रशासन व ऊस उत्पादन शेतकऱ्याचे मोलाचे सहकार्य मिळाल्याची माहिती कारखाण्याकडून देण्यात आली.
दरम्यान रवीद्रं बिरोले यानी शेतकऱ्याना दिलेला शब्द पाळत मागील २०१९-२० या वर्षीच्या गळीत हंगामाची शिल्लक असलेली रक्कम २०२०-२१ चा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वीचं शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याची दिवाळी गोड होऊन कारखान्याप्रती शेतकऱ्याचा विश्वास वाढला असल्याची माहिती कारखाण्याने दिली असून विघ्नसंतोषी लोकाच्या अफवाना शेतकऱ्यानी बळी न पडता जास्तीत-जास्त ऊस गळीतासाठी युटेकला देण्यासाठी कारखाना प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्याचे हित काहीना पाहवत नसल्याने वारंवार कारखान्याविरुध्द अफवा पसरवल्या जातात. मात्र आम्ही आता या अफवाना भिक घालत नसून आमचा ऊस उत्पादक शेतकरी अर्थिक बाबतीत समृध्द कसा होईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. २०२० - २१ या चालू गळीत हंगामात पहिल्या आठवड्यात ऊस देणाऱ्या शेतकऱ्याना पहिला हप्ता म्हणून २ हजार १११ रुपये लवकरचं बँक खात्यात वर्ग करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यानी कोणत्याही भुलथापाना बळी पडण्यापेक्षा युटेकच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहावे.
रवीद्रं बिरोले
संस्थापक युटेक शुगर लि. कौठे - मलकापूर