संगमनेर Live | संगमनेरच्या नगराध्यक्षा व जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून पर्यावरण, महिला सबलीकरण, समाजकारण, शिक्षण आधुनिकीकरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय निसर्ग मित्र समिती व ग्रामपंचायत टेंभे यांच्या वतीने कै. बापूसाहेब चिला शिवबा अहिेरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र भूषण जीवन गौरव या पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
टेंभे ता. बागलाण, जिल्हा नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, साहित्यिक कवी सुभाष सोनवणे, अतुल निकम, सरपंच भाऊसाहेब अहिरे, विश्वासराव पगार, सौ. निर्मलाताई गुंजाळ उपस्थित होते.
सौ. दुर्गाताई तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून खेडोपाडी, गावोगावी महिलांचे संघटन करुन महिला सबलीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, चर्चासत्रे, मार्गदर्शन, सहलीं बरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानात प्रकल्प प्रमुख म्हणून महत्वाची भूमिका संभाळली.
समाजकारणात राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गोरगरिबांसाठी विविध विकास कामांच्या योजना राबविल्या आहेत. जयहिंद युवा मंचच्या युवकांना प्रोत्साहन देत निरोगी व निकोप समाज निर्मितीचे काम हाती घेतले आहे. संगमनेर शहरासाठी स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर, सुंदर संगमनेर यासह विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहे. सामाजिक क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. गोरगरीब व अपंगासाठी विशेष योगदान त्यांनी दिले आहे. उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रबोधनवर व्याख्याने देत महिला सबलीकरणाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
सह्याद्री ते सातपुडा असे कार्य करतांना त्यांच्या कार्याचा गैारव राज्यपातळीवर झाला. त्यांच्या या कामाची दखल घेत विविध संस्थांतील बुलढाणा येथील स्व. विलासराव देशमुख प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार, फिलीवस फौंडेशनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, तेजस्वीनी पुरस्कार, वीरभारती पुरस्कार, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान पुणे पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार आदिं सह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, हा पुरस्कांर संगमनेर शहर व तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचा आहे. कारण या सर्वाचा विश्वास व त्यामुळे मिळालेली संधी यामधून आपल्याला कामाचे पाठबळ मिळाले.
दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याबद्ल त्यांचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, सौ. कांचनताई थोरात, माधवराव कानवडे, रामदास वाघ, रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, शिवाजीराव थोरात, बाबा ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, लक्ष्मणराव कुटे, सौ. मिराताई शेटे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर,अमित पंडीत, शंकरराव खेमनर, उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे यांसह सर्व नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.