◻ आश्वी खुर्द येथे मान्यवराच्या उपस्थितीत वृक्षारोपण.
संगमनेर Live | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आश्वी आणि पंचक्रोशीतील सर्व गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
स्मृतिदिनाच्या निमिताने प्रत्येक गावात वृक्षारोपण रोपण व्हावे यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या १०३ शाखांमधील विद्यार्थी प्राध्यापक स्थानिक स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा या उपक्रमात सहभाग होता.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब भोसले, विखे पाटील कारखान्याचे संचालक डाॅ. दिनकर गायकवाड, रामभाऊ भुसाळ, विनायकराव बालोटे, बाळासाहेब मांढरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहीणीताई किशोर निघुते, सामाजिक कार्यकर्ते विजय शेळके, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे, प्रशांत कोडोलिकर, प्राचार्य राम पवार, प्राचार्य सयाराम शेळके, रवी गायकवाड यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व कार्यकर्ते उपस्थित होते.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने आश्वी महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी ५० रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राम पवार यानी केली. सुत्रसंचालन प्रा. सुनंदा पाचौरे व डी. डी. तांबे यानी केले तर आभार उपप्राचार्य देविदास दाभाडे मानले आहेत.