◻ माघारीच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र होणार स्पष्ट.
◻ भाजप विरुद्ध कॉग्रेस ऐवजी आ. विखे विरुद्ध ना. थोरात संघर्षाच्या राजकारणाला पुन्हा मिळणार फोडणी.
संगमनेर Live | कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात पुन्हा आश्वी परिसरातील १४ ग्रामपचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने सत्ता वर्चस्वासाठी राजकीय संघर्ष आणखी तीव्रं होणार असल्याचे चित्र काल अखेर १३८ जागासाठी दाखल झालेल्या ४७० उमेदवारी अर्जावरुन स्पष्ट झाले असले तरी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अर्ज छाननी व ४ जानेवारी रोजी माघारीच्या दिवशी याबाबतचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.
संगमनेर तालुक्यातील परंतू शिर्डी विधानसभा मतदार संघात येत असलेल्या १४ ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान संपली होती. मात्र कोविड - १९ च्या जागतिक संकटामुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने प्रशासनाने अखेर या निवडणूका घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये १८ ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या कनोली ग्रामपंचायतीच्या ११ जागासाठी ३४ उमेदवारी अर्ज, २७ ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या पिप्रीं - लौकी अजमपूर ग्रामपंचायतीच्या ११ जागासाठी ३४ उमेदवारी अर्ज, २७ ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या चिचंपूर ग्रामपंचायतीच्या १३ जागासाठी ५८ उमेदवारी अर्ज, २८ ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या चणेगाव ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तर २८ ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या झरेकाठी ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी १७ उमेदवारी अर्ज, २८ ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या पानोडी ग्रामपंचायतीच्या ११ जागासाठी ३४ उमेदवारी अर्ज, ३० ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या प्रतापपूर ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी ६३ उमेदवारी अर्ज, ८ सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या शेडगाव ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी ३७ उमेदवारी अर्ज, ८ सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या ओझर खुर्द ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी २६ उमेदवारी अर्ज, ९ सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या औरंगपूर ग्रामपंचायतीच्या ७ जागासाठी २८ उमेदवारी अर्ज, ९ सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या खळी ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी १६ उमेदवारी अर्ज, ९ सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या दाढ खुर्द ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी २४ उमेदवारी अर्ज, ९ सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या शिबलापूर ग्रामपंचायतीच्या ११ जागासाठी ४४ उमेदवारी अर्ज, २९ सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या मनोली ग्रामपंचायतीच्या ११ जागासाठी ४० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान १४ गावातील १३८ जागासाठी तब्बल ४७० उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी ३१ डिसेंबर रोजी होणारी अर्ज छाणनी व नतंर उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी होणाऱ्या घडामोडी नतंर अपक्षासह इतर उमेदवाराची वेगवेगळ्या मार्गाने मनधरणी केली जाणार आहे. तर ४ जानेवारी म्हणजे अर्ज माघारीच्या दिवशी प्रत्यक्षात किती उमेदवार रिगंणात राहतात यावर स्थानिक पातळीवर तेथील प्रचाराची रणनीती आखली जाणार असल्याने ४ जानेवारीकडे उमेदवारासह मतदाराचे लक्ष लागले आहे.
ना. थोराता प्रमाणे आ. विखे पाटील याची ही यंत्रणा निवडणूकीच्या आखाड्यात..
संगमनेर तालुक्यातील ९४ ग्रामपचायतीवर आपले सत्ता वर्चस्व असावे यासाठी ना. थोरात याचे यशोधन कार्यालय कामाला लागले असून थेट यशोधन कार्यालयातून ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी तंज्ञाची मोठी फौज तैनात असल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे आ. विखे पाटील यांची यत्रंणा निवडणूसाठीचा ‘ प्रवरा पँटर्न ’ राबवण्यासाठी सज्ज झाल्यामुळे लवकचं या १४ गावानमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. तसेच स्थानिक कार्यकर्त्याची धावपळ वाढल्याने या १४ गावानमध्ये ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.