गुरुवारी संगमनेर तालुक्यात २१ कोरोना बाधीत रुग्ण.

संगमनेर Live
0
नूतन वर्षाच्या पुर्वसंध्येला संगमनेरकराची धाकधूक वाढली.

◻ जिल्ह्याची रुग्णसंख्या ८४ तर एकट्या संगमनेरमध्ये २१ बांधीत.

संगमनेर Live | नूतन वर्षाच्या पुर्वसंध्येला म्हणजे गुरवारी (३१ डिसेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात २१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आश्वी परिसरालातील मनोली या गावानमध्ये नव्याने पाच बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. मनोली येथे ग्रामपंचायत निवडणूक असल्याने प्रशासन व नागरीकानी काळजी घेणे गरजेचे आहे.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. गुरुवारी जिल्ह्यात ८४ नविन रुग्ण सापडले असून ११५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर संगमनेर तालुक्यात १५ नवीन रुग्ण आढळल्याने संगमनेरकराची धाकधूक वाढली असली तरी तालुक्यातील १९ रुग्ण गुरुवारी कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.०४ टक्के आहे.

गुरुवारी सापडलेल्या तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेरच्या शहरी भागात ५, मनोली येथे ५, झोळे येथे ३, चंदनापूरी येथे २, जवळे कडलग येथे १, राजापूर येथे १, घुलेवाडी येथे १, वडगावपान येथे १, अंबोरे येथे १, व निळंवडे येथे १ असे एकून २१ कोरोना बांधीत रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान आश्वी परिसरातील मनोली या गावामध्ये आज नव्याने बाधीत ५ रुग्ण आढळल्याने नागरीकानी सार्वजनीक ठिकाणी वावरतांना आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे असून घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावावा, मास्क वापरा स्वत:ला सुरक्षित ठेवा, स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे. 

तर ३१ डिसेंबरपर्यत जिल्ह्यात ६९,०१४ रुग्णांची नोंद झाली असून ६६,९७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९९९ रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यत जिल्ह्यात १०४५ रुग्ण दगावले आहेत.

टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !