संगमनेर Live | भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी मानवंदना दिली.
१ जानेवारी १८१८ रोजी या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती. यामध्ये ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशवांचा पराभव केला होता. या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ या विजय स्तंभाचे निर्माण ब्रिटिशांनी केले होते. दरवर्षी देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.
आज सकाळी ७ वा. ऍड. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, वंचितचे नेते अशोक सोनोने, प्रवक्ते अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक व प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.