संगमनेर Live | नाशिक जिल्हा तसेच तालुक्यातील शिंगवे बाहुला येथील धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या यमुनाबाई आबाजी गावंडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले असून मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते.
त्याच्या पश्चात चार मुले, सुना एक मुलगी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार असून येथील लहानु गावंडे व आंबादास गावंडे यांच्या त्या मातोश्री होत्या तर संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील पत्रकार संजय गायकवाड यांच्या त्या आजेसासु होत्या.