◻ छंत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये.
संगमनेर Live | औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा काही लोक अट्टाहास करीत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे वाद शासनाने बाजूला ठेवावेत. आता औरंगाबादचे नाव बदलू नये. औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असून महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेऊ नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
सध्या औरंगाबादच्या नामांतराचा वाद सुरू आहे. कोरोनाच्या या काळात जनता खडतर दिवसांना सामोरी जात असताना राज्याच्या विकासाचे विधायक मुद्दे बाजूला ठेऊन नामांतराचा मुद्दा राज्य सरकारने पुढे आणू नये. नामांतराच्या आंदोलनाची आम्ही धग भोगली आहे. त्यामुळे औरंगाबदचे आता नामांतर करू नये. औरंगाबादच्या नामांतरास रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील असे ना. रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत. मात्र संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये. असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.