राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.
संगमनेर Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. जिजाऊ माँसाहेब या आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत असल्याचे मुख्यमंत्री यांनी अभिवादनात म्हटले आहे.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणाले की, संकट काळात न डगमगता धैर्य आणि शौर्याने पुढे जाण्याची प्रेरणा म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वाभिमान जपण्याचा आणि दुर्बल, वंचितांच्या रक्षणाचा मूलमंत्र दिला. रयतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी त्यांनी मुत्सद्दीपणा आणि धीरोदात्तपणे पावले टाकली. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही जिजाऊ माँसाहेब यांचा करारी बाणा आणि धडाडी प्रेरणादायी अशीच आहे. प्रेरणेचा अखंड स्त्रोत, वंदनीय राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन म्हटले आहे.