◻ सात शेळ्या पैकी ३ ठार ; ३ जखमी तर १ शेळी घेऊन बिबट्याचे पलायन.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजामपूर येथिल लक्ष्मण किसन गिते याच्यां वस्तीवर बिबट्याने सोमवारी रात्री सात शेळ्यावर हल्ला केला. या हल्यात ३ शेळ्या ठार व ३ जखमी झाल्या. तर १ शेळी घेऊन बिबट्याने पलायन केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पिप्रीं - लौकी येथिल लक्ष्मण किसन गिते यांची गट नं - १२ मध्ये वस्ती व जनावराचा गोठा आहे. सोमवारी रात्री गिते कुटुंबिय गाढ झोपेत असताना बिबट्याने पाण्याच्या टाकीचा आधार घेत गोठ्यात प्रवेश केला व गोठ्यातील ७ शेळ्यावर हल्ला केला. त्यामुळे ३ शेळ्या ठार व ३ शेळ्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी बिबट्याने एक शेळी घेऊन पलायन केले.
दरम्यान मंगळवारी सकाळी गिते कुटुंबिय गोठ्यात गेल्यानंतर घडलेला प्रकार लक्षात आला. त्यामुळे गिते यानी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताचं वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यानी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. यामध्ये मृत तीन शेळ्याचा पंचनामा करण्यात आला असून यावेळी डॉ. शिदे, वनपाल उपासनी, एस. बी. सोनवणे व चौधरी आदिसह शेतकरी लक्ष्मण गिते उपस्थित होते.