◻ खळी ग्रामपंचायत निवडणूकीत दोन्ही दिग्गज नेते झळकताय एकाचं बँनरवर.
संगमनेर Live | राज्याच्या राजकारणात टोकाचा सत्तासंघर्ष असलेली दिग्गज जोडगोळी म्हणून प्रसिद्ध असलेले महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याला परिचित आहेत. परंतू हेच दिग्गज नेते संगमनेर तालुक्यातील खळी ग्रामपंचायतीची निवडणूक एकत्र लढत असल्याने मतदाराच्या भुवया उंचावल्याने उभ्या राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले असले तरी गावच्या पारावर ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने भाजप - कॉग्रेस एकत्र आले कसे.? याबाबत चर्चाचे फटाके फुटत आहेत.
अहमदनगर जिल्ह्याबरोबरचं राज्याच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात ना. थोरात व आ. विखे पाटील यांचा मोठा दबदबा आहे. पुर्वी कॉग्रेसमध्ये असतानाही लहान - मोठ्या निवडणूकीदरम्यान या दोन्ही दिग्गज नेत्यामध्ये सत्तासंघर्ष पाहवयास मिळत होता. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान आ. विखे पाटील भाजपवासी झाल्याने मागील काही महिन्यामध्ये ‘विखे - थोरात’ संघर्ष आणखी टोकाला नेऊन ठेवण्याचे काम सोशलमिडीयाच्या माध्यमातून दोन्हीकडील अतिउत्साही कार्यकर्त्यानी केले आहे.
९ सप्टेंबर २०२० रोजी मुदत संपलेल्या खळी ग्रामपंचायतीत ३ प्रभागात ९ जागासाठी निवडणूक होणार होती. गावच्या विकासासाठी ग्रामस्थानी एकत्र ऐऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थाच्या आग्रहाखातर ‘ विखे - थोरात ’ यानीही होकार दिला होता. त्यामुळे ग्रामस्थानी सुकाणू समितीच्या माध्यमातून ९ पैकी पाच जागा बिनविरोध करण्यात राजेद्रं चकोर, सुरेश नागरे यानी मोलाची भूमिका बजावली. परंतू ४ जागावर एकमत होत नसल्याने प्रभाग २ व ३ मध्ये अखेर ४ जागासाठी निवडणूक होणार असल्याने ‘ विखे - थोरात ’ याच्या कार्यकर्त्यानी एकत्र येऊन ग्रामविकास पँनलची स्थापन केली आहे.
‘ विखे - थोरात ’ गटाचे प्रभाग १ मधून सचिन शिवाजी आव्हाड, सुनिता सुखदेव कांगणे, कवराबाई संपत घुगे तसेच प्रभाग २ मधून मंडव दत्तू घुगे व प्रभाग ३ मधून राजेद्रं नामदेव चकोर हे पाच उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत. प्रभाग २ व ३ मधील ४ जागासाठी ’ विखे थोरात’ गटाच्या ग्रामविकास पँनलचे विलास गजानन वाघमारे, नंदू राधु उगलमुगले, कुंदा विठ्ठल लबडे व सविता शरद नागरे यांच्या विरुद्ध सोमनाथ नागरे, किशोर वाघमारे, जालिदर गवळी, सुनिल वाघमारे, सोपान वाघमारे याच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पँनलचे पांडुरंग विश्राम वाघमारे, एकनाथ भाऊसाहेब नागरे, माया किशोर वाघमारे यांच्यात सरळसरळ लढत होणार असून अपक्ष उमेदवार गणेश बाबासाहेब पालवे यांचेही आवाहन असणार आहे. त्यामुळे या अटीतटीच्या ४ जागाच्या निकालाकडे मतदाराचे लक्ष लागले आहे.
संगमनेर तालुक्यात येत असलेल्या शिर्डी मतदार संघातील खळी ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने विखे - थोरातानबाबत वेगळेचं चित्र मतदाराना पहावयास मिळत असल्याने या निवडणूकीच्या निमित्ताने मतदाराची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर दुसरीकडे खळी ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने भाजप - कॉग्रेस एकत्र आले कसे.? याबाबत चर्चाचे फटाके मात्र फुटत आहेत.
गावचा विकास केद्रंस्थानी ठेवुन ग्रामस्थाच्या पुढाकारातून ‘ विखे - थोरात ' गटाच्या कार्यकर्त्यानी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला आपयश आल्याने ही निवडणूक ग्रामविकास पँनलच्या माध्यमातून विखे - थोरात गटाकडून एकत्र लढवली जात आहे.
शरद नागरे, ग्रामविकास पँनल (भाजप)
खळी गावात बहुतांश एका विचाराचे नागरीक राहत असून येथे ऐकामेकाचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणूकीतील आरोप प्रत्यारोपामुळे निवडणूक संपल्यानंतरही एकमेकाविषयची कटूता जात नाही. त्यामुळे आतर्गत वाद वाढतात व विकास कामे करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेले प्रयत्न मात्र निष्फळ ठरल्यामुळे गट - तट बाजूला ठेवून ग्रामविकास पँनलच्या माध्यमातून विखे - थोरात गट एकत्र निवडणूक लढवत आहोत.
राजेद्रं चकोर, ग्रामविकास पँनल (कॉग्रेस)
खळी गावचा विकास खुंटला असून येथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. सर्वसामान्याची पिळवणूक व प्रशासकीय अधिकाऱ्याची मनमनी थांबवण्यासाठी परिवर्तन पँनलच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
सोमनाथ नागरे, परिवर्तन पँनल