◻ खळी ग्रामपंचायत निवडणूकीत ना. थोरात व आ. विखे पाटील गटाच्या सहमती एकस्प्रेसची बाजी.
संगमनेर Live | शिर्डी मतदार संघ व संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीचे धक्कादायक निकाल समोर आले असून विखे पाटील गटाकडे असलेल्या चिचंपूर, शेडगाव, झरेकाठी व पानोडी या ग्रामपंचायती थोरात गटाकडे गेल्याने आ. विखे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर ना. थोराताच्या ताब्यातील कनोली व मनोली ग्रामपंचायत विखे गटाने खेचून आणल्या आहेत. तसेच खळी ग्रामपंचायत निवडणूकीत ना. थोरात व आ. विखे पाटील सहमती एकस्प्रेस ने बाजी मारल्याने चारही उमेदवार निवडून आले आहेत.
आश्वी पंचक्रोशीतील कनोली ग्रामपंचायतीत आ. विखे पाटील गटाचे ७ सदंस्य निवडुन आल्याने विखे गटाने सत्ता मिळवून सत्तातंर केले आहे. तर येथे ना. थोरात गटाचे ४ सदंस्य निवडून आले आहेत.
ओझर बुद्रुक ग्रामपंचायतीत ना. थोरात गटाचे ८ सदंस्य निवडून आल्याने थोरात गटाने सत्ता राखली आहे. येथे आ. विखे पाटील गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
चणेगाव ग्रामपंचायतीत ना. थोरात गटाने मुसडी मारल्याने त्याचे ७ सदंस्य विजयी झाल्याने सत्ता मिळवली आहे. तर आ. विखे पाटील गटाचा अवघा १ सदंस्य निवडून आला आहे. याठिकाणी १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
दाढ खुर्द ग्रामपंचायतीत आ. विखे पाटील गटाने ७ सदंस्य निवडून आल्याने सत्ता राखली असून ना. थोरात गटाचे अवघे २ सदंस्य विजयी झाले आहे.
प्रतापपूर ग्रामपंचायतीसाठी आ. विखेना माननाऱ्या तीन गटातचं सत्ता वर्चस्वाची रस्सी खेच असताना भगवानराव इलग याचे ६ सदंस्य विजयी तर लक्ष्मण आंधळे, विलास आंधळे याचे ३ सदंस्य विजयी झाले आहेत.
पिप्रीलौकी अजमपूर ग्रामपंचायतीत आ. विखे गटाचे १० सदंस्य विजयी झाल्याने विखे गटाने सत्ता राखली आहे. येथे थोरात गटाचा अवघा १ सदस्य विजयी झाला आहे.
चिचंपूर येथे विखे गटाला मोठा धक्का बसला असून येथे थोरात गटाचे ८ सदंस्य निवडून आल्याने येथे थोरात गटाची सत्ता आली असून विखे गटाचे ५ सदंस्य निवडून आल्याने सत्ता गमावली आहे.
मनोली ग्रामपंचायतीत थोरात गटाला धक्का देत विखे गटाने ९ सदंस्य निवडून आणत बहुमत मिळवले आहे. येथे थोरात गटाचे फक्त २ सदंस्य निवडून आले आहेत.
औरंगपूर ग्रामपंचायतीत विखे गटाने ५ सदंस्य निवडून आणत सत्ता राखली आहे. येथे थोरात गटाचे २ सदस्य विजयी झाले आहे.
झरेकाठी ग्रामपंचायतीत थोरात गटाने ६ जागेवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली असून विखे गटाचे अवघे २ सदंस्य निवडून आले असून
शेडगाव ग्रामपंचायतीत थोरात गटाचे ६ उमेदवार विजय झाल्याने सत्ता बहुमत मिळवले आहे. येथे विखे गटाचे ३ सदंस्य विजयी झाले आहेत.
शिबलापूर ग्रामपंचायत विखे गटाने आपल्या कडे राखत ७ सदंस्य निवडणून आणले आहे. येथे थोरात गटाचे ४ सदंस्य विजयी झाले आहे.
पानोडी ग्रामपंचायतीत सत्तातर झाले असून थोरात गटाचे ८ सदंस्य निवडून आले असून विखे गटाला ३ विजयी सदंस्यावर समाधान मानावे लागले आहे.
संगमनेर विधानसभा मतदार संघातील डिग्रस व वरंवडी ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता आली आहे.
येत्या २५ जानेवारीला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार असल्याने अनेक समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान आ. विखे पाटील यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते असलेल्या चिचंपूर येथिल कैलास तांबे, शेडगाव येथिल पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सागळे, झरेकाठी येथिल अँड. पोपटराव वाणी, पानोडी येथील रावसाहेब घुगे व अशोक तळेकर या मातब्बर कार्यकर्त्याना आपल्या गावातील ग्रामपंचायती गमवाव्या लागल्याने आश्वी व जोर्वे जिल्हापरिषद गटात मोठी खळबळ उडाली आहे.