संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील दिपक साहेबराव भुसाळ या अविवाहित तरुणाचा नुकताच अपघाती मृत्यू झाल्याने उंबरी बाळापूर सह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
दिपक हा संगमनेर येथिल एका खाजगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता. दोन दिवसापुर्वी कामानिमित्त तो नाशिकला गेला असता काम आटपुन संगमनेरकडे येत असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास कऱ्हे घाटात अज्ञात वाहणाने त्याला धडक दिली. त्यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिपकचा मृत्यू झाला. त्याच्यावर शोकाकूल वातावरणात उंबरी बाळापूर येथे शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले आहे.
दरम्यान दिवगंत दिपकच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकस्मित निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.