संगमनेर Live | प्रभु श्रीराम हे विशाल आचार - विचाराचे असल्यामुळेचं त्यांना विश्वाचा आत्मा म्हणून संबोधले जाते. त्यांनी समाजात कुठल्याही प्रकारे भेद भाव केला नाही. त्यामुळे आयोध्या येथे कृती, संस्कृती व आकृतीनुसार श्रीराम मंदिर उभारणीला सुरवात झाली असून लोकांनी मनात सात्विक विचाराची ज्योत पेटविण्यासाठी अनावश्यक गोष्टी बाजूला केल्यास जीवन हे आणखी सुंदर होईल असे मौलिक मार्गदर्शन श्री दुर्गाशक्तीगडचे वेदांन्ताचार्य स्वामी अद्वैतानंद सरस्वती शास्त्री यांनी केले आहे.
आयोध्या येथे साकारत असलेल्या श्रीराम मंदिराबाबत जनमानसाला माहिती व्हावी यासाठी संगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथील युटेक शुगर लि प्रागंणात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना स्वामी अद्वैतानंद बोलत होते. यावेळी संघचालक अशोकराव सराफ, सहसंघचालक सुभाष कोथमिरे, पतीत पावन संघटनेचे प्रा. एस. झेड. देशमुख, युटेकचे संस्थापक रवीद्रं बिरोले, मिलिद शेटे, सुनिताताई पेंडारकर, संचालिका आश्विनीताई बिरोले, शशिकांत संत, गिरिष पदे, अॅड. रामदास शेजूळ, एकनाथ नागरे, हरिभाऊ गीते, सुभाफ कोळसे, शंतनू बिरोले, ईशा बिरोले, किशोर कालडा, बूवाजी खेमनर, भाऊसाहेब मंडलिक, गोरक्ष डहाळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रा. एस. झेड. देशमुख म्हणाले की, आपल्याला चुकीचा धर्म सागितला गेल्याने आपण आपलेचं शत्रु बनलो. वीर सावरकर व डॉ. आंबेडकरांचे आचार - विचार हे एकचं होते मात्र राजकिय स्वार्थापोटी त्यांची विभागणी केल्याचा दावा यावेळी त्यानी केला आहे. दरम्यान यावेळी सुभाष खेमनर, तान्हाजी बागुल, लक्ष्मण गिते, राहुल गंभिरे, पोपट पंचपिड, सुखदेव गंभिरे, नेहाबाई बागुल आदि उपस्थित होते. याप्रसंगी आयोध्या येथे आकारास येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन मान्यवराच्या हस्तें करण्यात आले आहे.
आयोध्येत राम मंदिर व्हावे हे अनेक वर्षाचे रामभक्ताचे स्वप्न अखेरीस पुर्णत्वास येणार आहे. या राम मंदिर निर्मितीसाठी लाखो हात मदतीच्या रुपाने पुढे येत असून युटेक शुगर लि ही आपला खारीचा वाटा उचलणार असल्याची भावना युटकचे चेअरमन रवीद्रं बिरोले यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.