◻ नामवंत विद्यार्थी घडवण्याबरोबरचं राजकारणातही उमटवला ठसा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द रहिवासी असलेले शिक्षक प्रदिप नामदेव वाल्हेकर हे नुकतेचं शिक्षक ते उपक्रमशिल मुख्याध्यपक असा प्रवास पुर्ण करुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून चणेगाव येथिल रामेश्वर विद्यालयातचं ज्ञानदानाला सुरवात करुन त्याच विद्यालयात सेवानिवृत्तीचा योग जुळून आल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थानाही यावेळी गहिवरुन आले होते.
शिक्षक प्रदिप नामदेव वाल्हेकर हे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल रहिवासी आहेत. त्याचे बी. ए. एम. एड. डी. एस. एम. पर्यत शिक्षण झाले असून विद्यार्थीदशेत असताना पी. व्ही. पी. महाविद्यालयात विद्यार्थी कृती समितीचे उपाध्यक्ष व बी. एड. महाविद्यालयात संगमनेर जनरल सेक्रेटरी (जी.एस) म्हणून त्यानी काम केले आहे. त्यानी १७ जून १९८७ साली श्री. रामेश्वर विद्यालय चणेगाव येथून ज्ञानदान सेवेला प्रारंभ केला. या कार्यकाळात बी. एड. कॉलेज लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) प्रमुख, स्काऊट / गाईड विभाग प्रमुख, हरित सेना प्रमुख, परिक्षा विभाग प्रमुख, सांस्कृतीक विभाग प्रमुख, सहल विभाग प्रमुख अशा विविध पदावर काम करताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. तसेच या काळात आपल्या विषयाबरोबरचं विद्यालयाचा निकाल १०० टक्कें लावण्यात त्यानी महत्वाचे योगदान देताना शिक्षक व विद्यार्थी घडवण्याचे काम केले.
शिक्षक प्रदिप वाल्हेकर यानी शैक्षणिक काम करत असताना आश्वी खुर्दचे दोन वेळा प्रशासकीय सरपंच पद, तसेच उपसरपंच पद, विविध सेवा सोसायटीचे संचालक पद व पतसंस्थेचे सलग ३० वर्ष संचालक पद अशी राजकीय पदे भुषवली असून शिक्षण संस्थेतील बी. पी. एड. महाविद्यालय येथे १ वर्ष, बी. एड. महाविद्यालय येथे ५ वर्ष तसेच आश्वी विद्यालयात १० वर्ष आदिसह विविध शाखेत ३३ वर्ष उल्लेखनीय ज्ञानदानाचे सेवाकार्य करत असताना न्यायाधीश शिवाजी गुळवे सारखे नामवंत सुमारे ७०० विद्यार्थी घडवले आहेत.
शिक्षक प्रदिप वाल्हेकर याचा नेवासे येथिल ज्ञानोदय संस्था, टाकळीभान या संस्थेने आदर्श शिक्षक हा मानाचा पुरस्कांर देऊन गौरव केला आहे. नुकताच चणेगाव विद्यालयात त्याचा छोटेखानी निरोप समारंभ पार पडला असून कोरोना प्रादुर्भाव सपल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हापरिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील याच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.
दरम्यान विविध सास्कृंतीक सामाजिक कार्यक्रमात सुत्रसंचालनाची आवड जोपासताना भविष्यात आधुनिक शेती व धार्मिक सेवाकार्य करण्याचा मानस सेवानिवृत्त मुख्याध्यपक प्रदिप वाल्हेकर यानी व्यक्तं केला असून दिवगंत प्राचार्य एस. के. मुसमाडे, व्ही. पी. वाजे व शिक्षणाधिकारी संपतराव आहेर हे शिक्षण क्षेत्रातील आपले प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले आहे.