‘युटेक’कडून कौठे-मलकापूर गावासाठी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथील युटेक शुगर लि. या कारखाण्याने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत संस्थापक अध्यक्ष रवीद्रं बिरोले याच्या हस्तें कौठे - मलकापूर गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे.

कौठे - मलकापूर गावाला अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. त्यामुळे युटेकचे चेअरमन रवीद्रं बिरोले व ग्रामस्थाच्या समन्वयातून ही योजना कार्यान्वित झाली आहे. सुरवातीला कारखाण्याने या योजनेचा पुर्ण खर्च केलेला असून ग्रामपंचायत करातून हिचे समायोजन केले जाणार आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान या कार्यक्रमप्रसंगी युटेकचे रवीद्रं बिरोले, बाबासाहेब खेमनर, बाबाजी सागर, बुवाजी खेमनर, हरिभाऊ गिते, सुखदेव गंभिरे, तान्हाजी बागुल, सुभाष कोळसे, एकनाथ नागरे, राहुल गंभिरे, कैलास डोगंरे, विश्वनाथ परचडे, सौ. संगिता गिते, लक्ष्मण गिते, लालु शेख, संदीप पचपिडं आदिसह ग्रामस्थं उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !