◻ १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान सप्ताह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी होणार साजरा.
संगमनेर Live | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये जनसामान्यांकरता विविध उपक्रम आयोजना बरोबर आरोग्य शिबीर, वैचारीक प्रबोधन, रॅली, रक्तदान शिबिर यांसह शाखांच्या उघडणी सोबत काँग्रेस बळकटीकरण सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर उत्तर अहमदनगर जिल्हा संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, नेवासे, श्रीरामपूर या तालुक्यांमधील विविध काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, बाजीराव खेमनर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, सुरेशराव थोरात, दादापाटील वाकचौरे, इंद्रभान थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, हिरालाल पगडाल, डॉ. एकनाथ गोंदकर, तुषार पोटेे, नितीनराव शिंदे, सुनील साळुंखे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, अंकुशराव कानडे, अभिजित लोनिया, रवींद्र साबळे, अरिफ तांबोळी, मिनानाथ पांडे, प्रा. कार्लस साठे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, गणपतराव सांगळे, सुभाष सांगळे, अनिस शेख, आनंद वर्पे, मदन मोकाटे, अॅड. त्र्यंबक गडाख, आकाश धनवटे, सुरेश झावरे, कचरु पवार, मनिषा नेहे, अॅड. समीन बागवान यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद गट व गण निहाय विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वकृत्वस्पर्धा, नोकरी मेळावा, मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन याचबरोबर गाव तेथे सक्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची शाखा, युवक काँग्रेसच्या विविध शाखांची निर्मिती यांसह विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अत्यंत लोकप्रिय व दूरदृष्टीचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे त्याचबरोबर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचतांना केलेली लोकोपयोगी कामे सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून हा पक्ष अगदी तळागाळापर्यंत पोहोचला आहे. श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये भाजप विरोधी लढा उभारला जात असून शेतकर्यांच्या विरोधी असलेल्या या सरकारने प्रजासत्ताकदिनी शेतकर्यांवर केलेला लाठी हल्ला हा अत्यंत वेदनादायक आहे. या सरकारचा पूर्ण देशांमधून निषेध होत असून याची जाणीव संपूर्ण ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली आहे. आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे धोरणात्मक निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचा अधिक चांगला उपयोग करावा असे म्हणाले.
आमदार लहू कानडे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यभर ठसा उमटवला आहे. यांच्या नेतृत्वात अहमदनगर जिल्हा पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करायचा आहे. यासाठी तरुणांनी सक्रीय व्हावे विविध उपक्रमांचे आयोजन व्हावे संविधान हा पवित्र धर्मग्रंथ असून याचे रक्षण करण्यासाठी आता प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे. उपक्रमांचे आयोजन बरोबर काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रास्ताविकात समन्वय ज्ञानदेव वाफारे यांनी या बळकटीकरण सप्ताहात राबवायच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान २० शाखा नव्याने उघडण्याचे नियोजन केले. याचबरोबर मधुकरराव नवले, तुषार पोटे, हिरालाल पगडाल, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना विविध विषयाची मांडणी केली.
यावेळी प्राध्यापक बाबा खरात, रमेश गफले, श्रीमती मंदाताई नवले, राजेंद्र औताडे, दादा आवारे, संकेत वाघमारे, समीर शेख, मदन मोकाटे, असीम बेग, विक्रम दंडवते, लता पारधे, पाटीलबुवा सावंत, सतिष खंडेलवाल, अनिस शेख आदिंसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.