◻ मनोली ग्रामपंचायत सरपंचपदी अशोक पराड याची वर्णी लागणार.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मनोली ग्रामपंचायत सरपंचपदी ग्रामपंचायतीचे माजी कर्मचारी अशोक पराड याची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून पराड कुटुंबियाची तीन पिढ्याची निष्ठा फळाला आल्याची प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थानी देऊन अशोक पराडावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
२७ जानेवारी रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मनोली येथे अनुसुचित जातीसाठी आरक्षण निघाले. या ग्रामपंचायतीत अशोक पराड हे एकमेव अनुसुचित जातीचे विजयी उमेदवार असल्याने सरपंचपद त्याच्याकडे आपसूक चालत आल्याने त्याची आता सरपंच पदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले, असले तरी पराड कुटुंबियाच्या तीन पिढ्याची आपल्या कामाप्रति असलेली प्रामाणिक निष्ठा फळाला आल्याची प्रतिक्रिया मनोली ग्रामस्थानी दिली आहे.
प्रामाणिक कामाचे फळ उशीरा का होईना मिळते असे आपले वाड-वडील आपल्याला सागूंन गेले आहेत. त्याची प्रचिती नुकतीचं मनोली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी झालेल्या आरक्षण सोडतीत जनतेने अनुभवली आहे. अशोक पराड हे मनोली ग्रामपंचायतीचे २३ वर्ष माजी शिपाई व काही काळ क्लार्क होते. त्याआधी त्याचे वडील भागा कृष्णा पराड हे मनोली-रहिमपूर-ओझर या ग्रुप ग्रामपंचायत स्थापनेपासून ते १९८७ सालापर्यत म्हणजे ४५ वर्ष शिपाई पदावर कार्यरत होते. तर मागील ७ वर्षापासून त्याचा मुलगा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत असताना इमाने इतबारे सेवा करत आहेत.
ज्या ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून पुढील पाच वर्ष १० वी पर्यत शिक्षण झालेले अशोक पराड आता बसणार आहेत. तर सह्यासाठी फाईली पुढे करणाऱ्या अशोक पराडापुढेचं सहीसाठी आता फाईली जाणार असल्याची स्तुती सुमने सोशलमिडीयाच्या माध्यमातून अशोक पराड याच्यावर उधळली जात असून देव प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ हे नेहमी देत असतो अशी प्रतिक्रिया संकल्प दूध संस्थेचे संस्थापक मच्छिद्रं भागवत यानी देऊन पराड याना शुंभेच्छां दिल्या आहेत.
दरम्यान मनोली ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यामध्ये जनसेवा ग्रामविकास मंडळाकडून किसन सिताराम शिंदे, अनिता संदिप साबळे, अभिजित प्रभाकर बेंद्रे, नितीन रावसाहेब शिदें, मिना सिताराम शिंदे, रुपम भाऊसाहेब गाडेकर, बिजला गोरक्ष नागरे, मनिषा अप्पासाहेब वर्पे, अशोक भागा पराड, झुंबरबाई वसंत जानराव व लहानबाई निवृत्ती ठोसर हे उमेदावार विजयी झाले असून भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याना माननाऱ्या गटाची सत्ता मनोली ग्रामपंचायतीवर आली आहे. सर्व विजयी उमेदवाराचे आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व जनसेवा मंडळाच्या सर्व जेष्ठ तसेच तरुण कार्यकर्त्यानी अभिनंदन केले आहे.
कुटुंबियाच्या आग्रहाखातर मी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. त्यामध्ये मतदारानी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी चागल्या मताधिक्याने विजयी झालो असून आता माझी सरपंचपदी वर्णी लागणार असल्याने आनंद आहे. केंद्र व राज्य शासनाची ग्रामपंचायतीसाठी असलेली प्रत्येक योजना सर्व ग्रामपंचायत सदंस्याच्या सहकाऱ्याने प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करणार असून घरकुल योजना, शुध्द पिण्याचे पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट आदिबरोबर कोणताही द्वेषभाव न ठेवता समाजातील प्रत्येक घटका पर्यत विकासकार्य नेण्याचा आमचा माणस राहिल.
अशोक पराड, ग्रा. प. विजयी उमेदवार