◻कारखाण्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याना न्याय देण्याचे काम केले - रवीद्रं बिरोले
संगमनेर Live | कौठे-मलकापूर येथिल खडकाळ माळरानावर श्री गजानन महाराज यांचे नाव घेवून युटेक शुगर लिमिटेड ची उभारणी केली. मागील ७ ते ८ वर्षात अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अडचणीवर मात करुन युटेक शुगरने ऊस उत्पादक शेतकरी, कारखाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी याच्यां परिश्रमाच्या जोरावर गरुड झेप घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्याना न्याय देण्याचे काम केले असून श्री गजानन महाराजाच्या कृपाआशिर्वादामुळेचं आज साखर कारखाना सुरळीत सुरु आहे. त्यामुळे युटेकचे श्री गजानन महाराज शुगर लि. असा नामबदल केला आहे. यावर्षी कारखाण्याने आतापर्यत ३ लाख ३५ हजार टन ऊस गाळप केल्याची माहिती श्री गजानन महाराज शुगर लि. चे संस्थापक अध्यक्ष रवीद्रं बिरोले यानी केले आहे.
श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथिल पहिला खाजगी साखर कारखाना असलेल्या ‘ युटेक शुगर लि. कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात रवीद्रं बिरोले बोलत होते. यावेळी युटेकचे नाव श्री गजानन महाराज शुगर लि करण्यात आल्याची घोषणा त्यानी केली. याप्रसंगी नामफलकाचे अनावरण उपस्थित मान्यंवराच्या हस्तें करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी कारखाना कार्यस्थळावर श्री गजानन महाराज प्रकटदिनाचे औचित्ते साधून विधीवत पुजन करुन युटेक चे श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड असे नामकरन करण्यात आले. यावेळी संस्थापक चेअरमन रविद्र बिरोले, न्यायधिश वाकचौरे, संचालक शंतनू बिरोले, सौ. आश्विनीताई बिरोले. अॅड. रामदास शेजूळ, सुभाष कोळसे, हरिभाऊ गीते, एकनाथ नागरे, नंदू भूजाडी, तोडमल आण्णा, अशोक वराळे, भारत कोरडे, बुवाजी खेमनर, अतुल नागरे, मुख्य कार्यकारी आधिकारी त्रिंबक बडे, अनिल वाकचौरे, गोरक्षनाथ डहाळे, तान्हाजी बागुल, वसंत चोरमल, अजित गुळवे, सचिन देशमाने, भाजपा तालुका उपाध्यक्ष महेश जगताप, भाऊसाहेब मंडलिक आदिसह मान्यवर उपस्थित होते.