पिप्रीं - लौकी अजमपूर येथे चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या.

संगमनेर Live
0
पती व भाया पोलिसाच्या ताब्यात.

संगमनेर Live | चारित्र्याच्या संश्यावरुन वारंंवार सासरी होणाऱ्या छंळास कंटाळून संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपूर येथिल विवाहित महिला शारदा जयराम गिते हिने गुरुवारी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात मयत शारदा हिचे वडील दगडू सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती जयराम चांगदेव गिते व भाया संतोष चांगदेव गिते यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती जयराम गिते व भाया संतोष गिते हे दोघे शारदा हिला लग्नानंतर एक वर्षापासून चारित्र्याचा संशय घेत किरकोळ कारणावरून वारवार मारहाण करत होते. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२० मध्ये महिलेने पती विरोधात तक्रांर दिली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा नांदायला गेली. तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती रुग्णालयात नोकरी करत होती. परंतू चारित्र्याचा संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ व मारहाण करुन नोकरी सोडण्यास भाग पाडले होते.

दोन दिवसापूर्वी जावई व मुलगी दोघे ही हाजरवाडी येथे मला भेटायला आले होते. यावेळी माझे पाय दुखत असल्याने जावई जयराम यांनी मुलगी शारदा हिला माझ्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी सोडून गेले होते. दुसऱ्या दिवशी दवाखान्यातुन आल्यानंतर शारदाला नवीन मोबाईल फोन विकत घेऊन दिला व तिला सासरी पिंप्री - लौकी येथे सोडले होते. रात्री ८.३० वा. मला जावई जयराम यांचा फोन आला की, ‘तुम्ही शारदाला मोबाईल घेऊन दिला आहे का.?’ मी हो म्हणटल्याने ‘ आमच्या घरात दोन फोन आहेत, त्यामुळे तुमचा मोबाईल घेऊन जा ’ असे म्हणाले. त्यामुळे चारीत्र्याचा संशय तसेच नवीन मोबाईल फोन विकत घेतल्याचा राग मनात धरुन किरकोळ कारणावरून शारदा हिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री शारदाने विषारी औषध घेतले. तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचा शुक्रवारी पहाटे महादेव गिते यांचा फोन आला. त्यामुळे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात गेल्यानतंर तेथे तिचा मृत्यू झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुरंन २०२१ नुसार भादंवी कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आरोपी पती जयराम चागदेव गिते व भाया संतोष चागदेव गिते याच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचे गाभिर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, गोपनीय विभागाचे विनोद गंभीरे, हवालदार शिदें, रणधीर, पारधी, पो. ना. शेख, चालक पथवे आदि पोलीस कर्मचाऱ्यानी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !