जावाकडून जावाला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न.

संगमनेर Live
0
मनोली येथिल घटना ; महिलेची प्रकृती स्थिर.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मनोली येथील अर्चना सदाशिव उर्फ दत्तू शिंदे (वय - २४) या महिलेला संरपण तोडण्याच्या कारणावरुन जावाने अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेच्या लहान मुलीनी दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे या महिलेचा जीव वाचला असला तरी, ही महीला ६० टक्के भाजलेली असून तिच्या जबाबावरुन आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जखमी अर्चना हीने पोलिसाना दिलेली माहिती अशी की, माझे पती सेंट्रीगचे काम करत असून त्यांना किडनीचा आजार आहे. भाया शंकर शिंदे, जाव आकांक्षा व चुलत सासू हरणाबाई शिंदे असे त्याचे एकत्रित कुटुंब आमच्याचं शेजारी राहतात. भाया नोकरीनिमित्त परभणी येथे वास्तव्यास आहे. माझ्या पतीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची गरज असल्याने आम्ही आमच्या हिश्याची जमीन विक्रीस काढली होती. त्यामुळे भाया आमची जमीन कमी किमतीत मागू लागला. मात्र दुसरीकडून जास्त पैसे मिळाल्याने आम्ही ती जमीन त्याना विकली. याचाचं राग मनात धरुन सासू, जाव व भाया या ना त्या कारणावरुन सतत आमच्यासोबत वाद घालत होते.

गुरुवार दि. ११ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता मी घराशेजारी मी संरपण तोडत असताना जाव आकांक्षा तेथे आली व आमचे संरपण तोडू नको म्हणत तिने भायाला फोन केला. फोनवरुन भाया सुद्धा म्हणाला की, आमचे संरपण आहे तोडू नको नाहीतर पैसे दे. पण माझे संरपण असल्याने मी तोडणार म्हटल्यावर, जाव आकांक्षाने कुऱ्हाडीच्या दाड्यांने मला मारहाण केली व हीची कटकट कायमचीचं मिटवू म्हणत घरातील डिझेलचा डबा आणला यावेळी सासू हरणाबाई हिने माझे दोन्ही हात धरले व जावाने माझ्या अंगावर डिझेल ओतून आग लावली. त्यामुळे मी आरडा ओरड केल्याने माझ्या मुली घराच्या बाहेर आल्या व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कुकर व मग्यामध्ये पाणी आणून मला लागलेली आग विझवली. त्यानंतर पतीला फोनवरुन घडलेला प्रकार सागितल्याने पती तत्काळ घटनास्थळी आले व त्यांनी मला प्रवरा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान जाव आकांक्षा शंकर शिंदे, सासु हरणाबाई नाना शिदे (रा. मनोली, ता. संगमनेर) व भाया शंकर सावित्रा शिदे (रा. मनोली, ता. संगमनेर, हल्ली रा. परभणी) या तिघाविरुद्ध गुरंव नंबर ३२/२०२१ नूसार भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ५०७ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. तर महिलेवर लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !