◻गुरुवारी आश्वी पंचक्रोशीतील सहा गावानमध्ये आकरा कोरोना बाधीत रुग्ण आढळले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुचं असून गुरुवारी (२५ मार्च) तालुक्यात ९१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आश्वी पंचक्रोशीतील आश्वी खुर्द, शेडगाव, ओझर बुद्रुक, कनोली, औरंगपूर, मांची या सहा गावानमध्ये आकरा कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेरच्या शहरीभागात ३५, आश्वी खुर्द येथे १, शेडगाव येथे ६, ओझर बुद्रुक येथे १, कनोली येथे १, औरंगपूर येथे १, मांची येथे १, जोर्वे येथे १, पिपंरणे येथे १, गुंजाळवाडी येथे ५, घुलेवाडी येथे ६, जाखोरी येथे १, चिकणी येथे १, खांडगाव येथे २, कोल्हेवाडी येथे २, पिपळगाव कोझिंरा येथे १, नान्नज दुमाला येथे १, निमगाव बुद्रुक येथे १, पारेगाव येथे १, साकूर येथे २, खाजांपूर येथे १, वडगावपान येथे १, सावरगावतळ येथे २, चंदनापूरी ३, हिवरगाव पावसा येथे १, पिपळगाव देपा येथे १, झोळे येथे २, रायते येथे १, मंगळापूर येथे २, कुरकुटवाडी येथे १, मालदाड येथे २, अकलापूर येथे १ व संगमनेर खुर्द येथे २ असे एकून ९१ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील आश्वी खुर्द, शेडगाव, ओझर बुद्रुक, कनोली, औरंगपूर, मांची या सहा गावानमध्ये आकरा कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी तोडाला मास्क लावण्याबरोबरचं सोशल डिस्टन्सचे पालण करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार १५ एप्रिल पर्यत बंद.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यानी शुक्रवार (२६ मार्च) रोजी दिलेल्या आदेशात म्हटले असून २९ मार्च ते १५ एप्रिलपर्यत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद राहतील, असे या आदेशात म्हटले आहे. मागील वर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला होता. त्याच प्रमाणे यावर्षीही १५ एप्रिलपर्यत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार कोरानामुळे बंद राहणार आहेत.