शुक्रवारी संगमनेर तालुक्यात २०५ कोरोना बाधित रुग्ण.

संगमनेर Live
0
◻ आश्वी पंचक्रोशीत शनिवारी १०० टक्के लॉकडाऊन. तर पुन्हा आश्वी पंचक्रोशीत २९ कोरोना बाधित रुग्ण आढळले.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात शुक्रवार (दि. ९ एप्रिल) रोजी २०५ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये २९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभाग एकाकी लढा देत असल्याचे चित्र कायम असून सरकारने लागू केलेल्या दोन दिवसीय लॉकडाऊनला शनिवारी आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

शुक्रवारी संगमनेरच्या शहरीभागात ४५, उंबरी बाळापूर येथे ४, आश्वी खुर्द येथे २, आश्वी बुद्रुक येथे १, निमगावजाळी येथे ४, पानोडी येथे १, रहिमपूर येथे २, कोल्हेवाडी येथे ७, मनोली येथे १, मांची येथे १, चिचंपूर येथे २, सादतपूर येथे ४, कोकणगाव येथे ३, जोर्वे येथे ५, पोखरी हवेली येथे १, गुंजाळवाडी येथे ७, धादंरफळ बुद्रुक येथे १, सावरगावतळ येथे ४, घुलेवाडी येथे २१, पेमगिरी येथे २, मेढंवन येथे १, निमज येथे २, सागंवी येथे १, निभाळे येथे १, मिर्झापूर येथे १, हिवरगाव पावसा येथे ४, कौठे कमळेश्वर येथे १, काकडवाडी येथे १, निमगाव बुद्रुक येथे २, 

चिचोंली गुरव येथे २, सारोळे पठार येथे १, रायतेवाडी येथे २, नादूंर खदारमाळ येथे १, निमोण येथे २, वडझरी खुर्द येथे १, वडगाव लाडगा येथे ३, निमगावपागा येथे १, पळसखेडे येथे २, जाखोरी येथे १, सायखिडी येथे १, वडगावपान येथे ४, कसारे येथे ३, करूले येथे १, खाजापूर येथे २, तळेगाव दिघे येथे ४, नान्नज दुमाला येथे २, कसारवाडी येथे ३, ढोलेवाडी येथे १, चंदनापूरी येथे २, सुकेवाडी येथे ५, खंदारमाळ येथे ३, सावरगाव घुले येथे १, निळवंडे येथे २, केळेवाडी येथे ४, मांडवे बुद्रुक येथे १, समनापूर येथे १, मालदाड येथे ७, पिपंळे येथे २, चिकणी येथे २, चिखली येथे १ व राजापूर येथे ५ असे एकून २०५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये शुक्रवारी पुन्हा २९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. दरम्यान शनिवारी लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, पोलीस हेड कॉस्टेबल शिदें, काळे, दहिनिवाल, सोनवणे, निलेश वर्पे, सौ. चांडे, पथवे आदिनी चोख बदोबस्तं ठेवला होता. यावेळी पोलीसानी विनामास्क फिरणाऱ्या दोघाना हजार रुपये दंड करत कारवाई केली आहे.

ब्रेक द चेनला प्रतिसाद द्या..

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस मोठे होत चालल्याने सरकारने पाच दिवस कठोर निर्बंध लावत शनिवार व रविवार या दोन दिवस १०० टक्के लॉकडाऊन लावला असून ‘ ब्रेक द चेन ’ मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे नागरीकानी आपल्याला व कुटुंबाला कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊनला प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

सुधाकर मांडवकर, पोलीस निरीक्षक आश्वी.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !