◻ आश्वी पंचक्रोशीत आढळले ४३ कोरोना बाधित रुग्ण.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात गुरुवार (दि. १६ एप्रिल) रोजी २९७ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये ४३ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून उंबरी बाळापूर, मनोली, आश्वी खुर्द निमगावजाळी, चिचंपूर, पिप्रीं येथे बाधीताची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चितां व्यक्त होत आहे.
शुक्रवारी संगमनेरच्या शहरीभागात ३२, संगमनेर खुर्द येथे ३, उंबरी बाळापूर येथे ९, आश्वी बुद्रुक येथे १, आश्वी खुर्द येथे ७, निमगावजाळी येथे १, चिचंपूर येथे ३, मनोली येथे ६, शिबलापूर येथे १, खळी येथे १, हंगेवाडी येथे २, पिप्रीं-लौकी अजमपूर येथे १, कोल्हेवाडी येथे ७, औरंगपूर येथे १, कनोली येथे २, ओझर बुद्रुक येथे १, पिपंरणे येथे २, कोकणगाव येथे ४, निभाळे येथे १, बोटा येथे ५, अकलापूर येथे २, नादूंर खंदारमाळ येथे १, मिर्झापूर येथे २, खांडगाव येथे २, निमज येथे २, रायतेवाडी येथे २, धादंरफळ बुद्रुक येथे ४, निमगाव येथे १, निमगाव खुर्द येथे २, पेमगिरी येथे १, निमगाव टेंभी येथे १, खंदारमाळ येथे ३, कौठे बुद्रुक येथे १, कौठे खुर्द येथे ५, आंबी खालसा येथे ४, बोरबन येथे २, खांजापूर येथे २,
कसारवाडी येथे १, निळवंडे येथे १, बिरेवाडी येथे १, देवकौठे येथे ४, काकडवाडी येथे १, जाबुंत खुर्द येथे १, वरंवडी येथे १, निमगाव भोजापूर येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे १, कसार दुमला येथे १, चिचोंली गुरव येथे १, माळेगाव हवेली येथे १, पारेगाव बुद्रुक येथे २, समनापूर येथे ४, सोनेवाडी येथे १, पिपळे येथे ३, तळेगाव दिघे येथे २, वेल्हाळे येथे १, पावबाकी येथे २, वडगावपान येथे १, पिपळगाव देपा येथे ३, रायते येथे १, सुकेवाडी येथे ६, कसारवाडी येथे १, वाघापूर येथे २, घारगाव येथे ३, नान्नज दुमाला येथे ४, वडगाव लांडगा येथे ४, साकूर येथे ६, हिवरगाव पावसा येथे ६, चंदनापूरी येथे ४, झोळे येथे ७, जोर्वे येथे ४, सावरगाव तळ येथे १, शिरापूर येथे २, कर्जुले पठार येथे २, डोळासणे येथे १, पोखरी बाळेश्वर येथे २, सावरगाव घुले येथे २, खंडेरायवाडी येथे १, सारोळे पठार येथे २, सायंखिडी येथे ३, घुलेवाडी येथे ४२, गुंजाळवाडी येथे १२, चिखली येथे ६, राजापूर येथे ५ व जवळे कडलग येथे ४ असे एकून २९७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये गुरुवारी ४३ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात पुढील १४ दिवस जनता कर्फ्यू - पालकमंत्री
जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने किंबहूना अधिक कडकपणे नियमांचे पालन करुन कोरोनाची ही लाट थोपविण्याची गरज आहे, असल्याचे राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहज. पुढील १४ दिवस आता जिल्ह्यात जनता कर्फ्यू आवश्यक असून तरच संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल. त्यासाठी आता ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी क्रियाशील होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.