◻ घुलेवाडीत संसर्ग वाढला तर आश्वी परिसराला काहिसा दिलासा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात रविवारी (दि. १८ एप्रिल) रोजी २२६ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावाना दिलासा मिळाला असून ४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. उंबरी बाळापूर, निमगावजाळी, पिप्रीं येथे पुन्हा बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरीकानी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी संगमनेरच्या शहरीभागात २६, उंबरी बाळापूर येथे १, निमगावजाळी येथे १, पिप्रीं-लौकी अजमपूर येथे १, कोल्हेवाडी येथे १, कोकणगाव येथे ८, खरशिंदे येथे १, पारेगाव येथे २, पारेगाव बुद्रुक येथे १, निळवंडे येथे ५, ढोलेवाडी येथे ३, निमोण येथे २, तळेगाव दिघे येथे ७, देवकौठे येथे ३, कसारे येथे ७, कौठे कमळेश्वर येथे येथे ३, वडगावपान येथे ७, काकडवाडी येथे ४, चिचोंली गुरव येथे १, नान्नज दुमाला येथे १, सुकेवाडी येथे ५,
हिवरगाव पावसा येथे येथे १, चंदनापूरी येथे २, रायतेवाडी येथे ७, झोळे येथे १, कौठे बुद्रुक येथे १, बोरबन येथे २, समनापूर येथे २, घारगाव येथे १, मालदाड येथे १, पिपळे येथे १, पोखरी हवेली येथे १, करुले येथे १, वेल्हाळे येथे १, बोटा येथे २, नादूंर खंदारमाळ येथे १, देवगाव येथे १, खांबे येथे १, घुलेवाडी येथे ८७, गुंजाळवाडी येथे २, राजापूर येथे २, मंगळापूर येथे ३, चिखली येथे १ व जवळे कडलग येथे ३ असे एकून २२६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावाना रविवारी दिलासा मिळाला असून ४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
संगमनेरमध्ये पोलिसाचा रुटमार्च..
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यानी आज संगमनेर येथे सर्व प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन कोरोना बाबत आढावा घेतला. त्यानी अत्यावश्यक त्या सूचना करून त्यावर कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश देऊन नागरीकानी गर्दी करु नये असे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसिलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन बांगर उपस्थित होते. यावेळी संगमनेर शहरामध्ये पोलिसानी रुटमार्च काढला होता.