◻ तालुक्याला काहिसा दिलासा तर आश्वी परिसरातील सहा गावात ११ बाधीत रुग्ण आढळले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्याला मंगळवारी (दि. २७ एप्रिल) रोजी काहिसा दिलासा मिळाला असून तालुक्यात १४६ तसेच आश्वी पंचक्रोशीतील सहा गावानमध्ये ११ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, ओझर खुर्द, रहिमपूर, मनोली आदि ठिकाणी पुन्हा बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवारी संगमनेरच्या शहरी भागात ३४, संगमनेर खुर्द येथे ४, उंबरी बाळापूर येथे ३, आश्वी खुर्द येथे १, ओझर खुर्द येथे १, रहिमपूर येथे १, मनोली येथे १, कनोली येथे ४, जोर्वे येथे २, पावबाकी येथे १, समनापूर येथे ४, कोल्हेवाडी येथे १, सुकेवाडी येथे ३, घारगाव येथे १, ढोलेवाडी येथे २, पिपळगाव कोझिंरा येथे ३, नान्नज दुमाला येथे ३, खंडेरायवाडी येथे १, सावरगाव घुले येथे २, धादंरफळ बुद्रुक येथे १, सावरगावतळ येथे १, निमोण येथे २, साकूर येथे ५, चिकणी येथे १, चिखली येथे १, रायतेवाडी येथे ३, सारोळे पठार येथे ५,
माळेगाव हवेली येथे १, सोनूशी येथे १, झोळे येथे २, वाघापूर येथे १, बिरेवाडी येथे १, वेल्हाळे येथे १, वडगावपान येथे २, देवगाव येथे १, चंदनापूरी येथे १, हिवरगाव पावसा येथे १, पिपंरणे येथे २, पोखरी हवेली येथे २, कसार दुमला येथे १, निबांळे येथे २, खराडी येथे २, सायंखिडी येथे १, खांबे येथे १, पिपळगाव माथा येथे १, नादूंर खंदारमाळ येथे १, बोटा येथे ५, अकलापूर येथे १, मेढंवन येथे १, निमगाव बुद्रुक येथे २, घुलेवाडी येथे ८, गुंजाळवाडी येथे ८, मंगळापूर येथे १, राजापूर येथे २ व चिखली येथे १ असे एकून १४६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील सहा गावानमध्ये मंगळवारी ११ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावण्याबरोबर लॉकडाऊनचे कडक पालण करावे असे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.