बुधवारी संगमनेर तालुक्यात ३१९ कोरोना बाधित.

संगमनेर Live
0
आश्वी परिसरातील १५ गावात ५२ बाधीत रुग्ण आढळले.

संगमनेर Live | तालुक्यात बुधवारी (दि. २८ एप्रिल) रोजी ३१९ तसेच आश्वी पंचक्रोशीतील १५ गावानमध्ये ५२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, ओझर खुर्द, रहिमपूर, निमगावजाळी, मनोली आदि ठिकाणी पुन्हा बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

बुधवारी संगमनेरच्या शहरी भागात ३५, संगमनेर खुर्द येथे ५, उंबरी बाळापूर येथे १५, आश्वी बुद्रुक येथे २, आश्वी खुर्द येथे ९, ओझर बुद्रुक येथे १, ओझर खुर्द येथे १, रहिमपूर येथे ३, मनोली येथे २, कनोली येथे २, पिप्रीं येथे ५, मालुंजे येथे १, निमगावजाळी येथे ७, शिबलापूर येथे १, चिचंपूर येथे १, मांची येथे १, कोल्हेवाडी येथे १, म्हसंवडी येथे १, बोटा येथे ३, धादंरफळ येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे २, धादंरफळ खुर्द येथे २, कौठे धादंरफळ येथे २, सारोळे पठार येथे ४, डोळासणे येथे १, मेढंवन येथे २, सायंखिडी येथे १, निमगाव येथे ३, निमगाव बुद्रुक येथे २, निमगाव खुर्द येथे ४, निमगावपागा येथे ८ मिर्झापूर येथे ४, शिवापूर येथे ४, जाबुंत खुर्द येथे १, वरंवडी येथे २, झोळे येथे ३, निमगाव टेंभी येथे १, हिवरगाव पठार येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे १, काकडवाडी येथे १, 

पारेगाव बुद्रुक येथे १, वडगावपान येथे १, पोखरी हवेली येथे १, भोजदरी येथे १, शेळकेवाडी येथे १, कुरकुडी येथे ३, कुरकुटवाडी येथे १, नान्नज दुमाला येथे १, खंदारमाळ येथे १, शिरापूर येथे ५, मालदाड येथे ४, खांडगाव येथे ४, निबांळे येथे ३, ढोलेवाडी येथे ७, सुकेवाडी येथे १, समनापूर येथे ४, कसार दुमला येथे ३, आंबी खालसा येथे १, वडगाव लाडंगा येथे ५, रायते येथे २, रायतेवाडी येथे ६, नादूंरी दुमाला येथे ३, पेमगिरी येथे २, वाघापूर येथे १, देवकौठे येथे १, अंभोरे येथे ३, कोकणगाव येथे ३, पावबाकी येथे ३, निमज येथे ६, वेल्हाळे येथे ५, निळवंडे येथे २, पिपंरणे येथे ८, निमगाव भोजापूर येथे ४, तळेगाव दिघे येथे १, पोखरी येथे १, देवगाव येथे १, सावरगावतळ येथे २, खराडी येथे २, साकूर येथे ८, हिवरगाव पावसा येथे २, दरेवाडी येथे २, जोर्वे येथे ६,  घुलेवाडी येथे १७, गुंजाळवाडी येथे ९, मंगळापूर येथे ७, राजापूर येथे १२, चिकणी येथे २, चिखली येथे २ व जवळे कडलग येथे २ येथे  असे एकून ३१९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील १५ गावानमध्ये बुधवारी ५२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावण्याबरोबर लॉकडाऊनचे कडक पालण करावे असे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !