◻ नागरीकानी जबाबदारीने वागावे - डॉ. तय्यब तांबोळी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीसह ग्रामिण भागातील गावांनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाला असून मृत्यूचे ही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव आदि परिसरातील गावे लाँकडाऊन करण्यात आली आहेत.
मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मोठ्या संख्येने करोना बाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, शिबलापूर, पिप्री - लौकी अजमपूर, पानोडी, प्रतापपूर गावातील रुग्णसंख्येत आणखी वाढ होऊ नये, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने येथिल दवाखाने, मेडिकल, दुध संकलन, घरपोच गॅस सेवा, पीठ गिरणी व बॅका या अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व दुकाने १० मे पर्यत बंद ठेवून कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासुन तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावानमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधीताचा आकडा वाढतचं होता. त्यामुळे शासनाने कडक निर्बध लावले होते. मात्र नागरिक करोना प्रतिबंधक त्रिसुर्तीचे काटेकोर पालन करत नसल्यामुळे करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरीकानी जबाबदारीने वागावे असे आवाहन ग्रामपंचायत, महसूल तसेच पोलीस प्रशासनाने केले आहे.
करोना हा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात फैलावत असून नागरीकानी तोडावर मास्क लावावा, नेहमी साबनाने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित ठेवल्यास करोनावर मात करणे शक्य होईल. नागरीकानी कोरोना लस घ्यावी व त्यासाठी गर्दी होणार नाही याची ही दक्षता घ्यावी. तसेच कोणताही आजार आगावर न काढता त्यावर योग्य ते औषध उपचार करावेत.
डॉ. तय्यब तांबोळी, वैद्यकिय अधिकारी निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केद्रं.