संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं लौकी आ
अजमपूर शिवारात रविवारी सायंकाळी ऊभा ट्रासफार्म जळून खाक झाला असून यावेळी लगत असलेला पोल्ट्री फार्म थोडक्यात बचावला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शरद आप्पाजी दराडी यांच्या शेतातील ऊभ्या ट्रासफार्मने अचानक पेट घेतला व काही वेळात हा ट्रासफार्म जळून खाक झाला. यावेळी अवघ्या दोनशे फुटाच्या अतंरावरील डॉ. पप्पू दराडी यांचा १० हजार पक्षी असलेला पोल्ट्री फार्म थोडक्यात बचावला आहे. या ट्रासफार्मरवर २० ते २१ कनेक्शन असून ट्रासफार्म जळाल्याने त्याचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ओवरलोडिंगमुळे ट्रासफार्मर जळाल्याचा अदांज वर्तवला जात असला तरी यावेळी कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. तर ट्रासफार्मर जळाल्याने महावितरणचे अदांजे ३ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.