संगमनेर Live | कोल्हार घोटी राज्यमार्गावरील सादतपुर शिवारात झालेल्या अपघातात चंद्रपुर (ता. राहाता) येथिल रंगा उर्फ सयाजीराव गिताराम घुले (वय - ४०) यांचे दुर्देवी निधन झाले असून एका होतकरू उद्योजकाचे आकस्मिक निधन झाल्याने चंद्रपुरसह पंचक्रोशीत दु:ख व्यक्तं होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सयाजीराव हे आपल्या दुचाकीने राहत्या घरी चंद्रपूर येथे चालले होते. यावेळी सादतपुर शिवेलगत अज्ञात वाहनाने त्याना जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताचं आश्वी पोलीस स्टेशनचे साहय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, हेड काॅन्सटेबल विजय काळे, पोलिस जीप चालक पथवे यानी घटनास्थळी धाव घेऊन सयाजीराव घुले यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय हालविले मात्र उपचारापुर्वीचं त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान सयाजीराव घुले हे तरुण उद्योजक म्हणून परिसरात परिचित होते. तसेच निमगावजाळी शिवारात असलेल्या हिंदुस्तान इंजीनियरिंगचे ते संचालक होते. त्याचा दाडंगा जनसंपर्क होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे चंद्रपुर व निमगावजाळी सह पंचक्रोशीत दु:ख व्यक्तं होत आहे.