◻आश्वी पंचक्रोशीत ३० कोरोना बाधित रुग्ण. तर आश्वी खुर्द कोरोनाच्या मगरमिठ्ठीत.
◻आरोग्य विभागाचा एकाकी लढा, इतर यत्रंणा मात्र सुस्तावल्या.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात बुधवार (दि. ७ एप्रिल) रोजी विक्रमी २०९ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये ३० कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी तोडाला मास्क लावून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य विभाग एकाकी लढा देत असल्याचे चित्र असून इतर यत्रंणा मात्र सुस्तावल्याने कोरोनाचा आलेख वाढत आहे.
बुधवारी संगमनेरच्या शहरीभागात ४७, संगमनेर खुर्द येथे २, उंबरी - बाळापूर येथे २, आश्वी बुद्रुक येथे १, आश्वी खुर्द येथे १०, चिचंपूर येथे ४, प्रतापपूर येथे ३, झरेकाठी येथे ३, खळी येथे १, दाढ खुर्द येथे १, ओझर बुद्रुक येथे १, कनोली येथे १, मनोली येथे १, कोकणगाव येथे २, कोल्हेवाडी येथे २, सुकेवाडी येथे ५, अंभोरे येथे ३, पिपंरणे येथे १, जोर्वे येथे ३, जाखुरी येथे २, गुंजाळवाडी येथे १७, वेल्हाळे येथे १, तळेगाव दिघे येथे ८, वाघापूर येथे १, सारोळे पठार येथे ४, नादूंर खदारमाळ येथे १, निमगाव भोजापूर येथे १, पिपळगाव देपा येथे १, खाजापूर येथे ६, वडगावपान येथे ६, निमज येथे २, खंदारमाळ येथे ४, घारगाव येथे २, साकूर येथे ३, घुलेवाडी येथे १८, पोखरी हवेली येथे १, वडगांव लांडगा येथे १, नादूंरी दुमाला येथे २, शिवापूर येथे २, धादंरफळ खुर्द येथे २, पारेगाव बुद्रुक येथे १, मेढंवन येथे १, रायतेवाडी येथे १, चंदनापूरी येथे ४, पावबाकी येथे १, कौठे खुर्द येथे २, कौठे बुद्रुक येथे ४, चिचोंली गुरव येथे ४, खराडी येथे २, हिवरगाव पावसा येथे २, आंबी खालसा येथे १, सावरगाव घुले येथे १, लोहारे येथे १, राजापूर येथे १, चिखली येथे ३ व जवळे कडलग येथे २ असे एकून २०९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये बुधवारी ३० कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून आश्वी खुर्द येथे कोरोनाचा उद्रेक झाला असून एकाचं दिवशी १० बाधीत रुग्ण आढळले असून आश्वी खुर्द येथिल ३५, चणेगाव येथिल ३०, झरेकाठी येथिल ३५ तर शेडगाव येथिल २५ बाधीतावर उपचार सुरु आहे. तर परिसरातील साधारणतः आडीशे ते तीनशे जणाचे चाचणी अहवाल येणे बाकी असल्याने कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. दरम्यान मांची येथिल कोविड रुग्णालयात सध्या ५५ बाधीत रुग्णावर उपचार सुरु असून नागरीकानी दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य अधिकारी तय्यब तांबोळी यानी केले आहे.
बाधीत रुग्ण मोकाट.?
सध्या अँटीजन रँपिड चाचण्याची संख्या घटल्याने आरटीपीसीआर चाचण्यावर आरोग्य विभागाचा भर आहे. या आरटीपीसीआर चाचण्याचा अहवाल पाच ते सहा दिवसानी येत असल्याने तोपर्यंत हे बाधीत रुग्ण गावात मोकाटपणे वावरतात व इतर नागरीकाशी मोठ्या प्रमाणात संपर्कात येत असतात. त्यामुळे बाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आरोग्य विभागाने अँटीजन रँपिड चाचण्या सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे तात्काळ निदान होऊन त्या बाधीतावर उपचार करुन कोरोनाचा प्रसार थांबवण्यास मदत होणार आहे.
मागील वर्षी कोरोनाबाबत वरपासून खालपर्यंत प्रशासन सतर्क होते. मात्र मागील सहा महिन्यापासून कोरोनाबाबत गावपातळीवर कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे आता कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे प्रातांधिकारी व तहसिलदार यानी ग्रामप्रशासनाला गावपातळीवरील कोरोना समित्या पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सुचना देणे गरजेचे आहे. कारण सध्या केवळ आरोग्य विभाग एकाकी झुंज देताना दिसत असून कोरन्टाईन करायला गेलेल्या आशासेविकाना गलिच्छ भाषेचा शब्दप्रयोग केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील नागरीकाना वचक निर्माण होणे गरजेचे असल्याने गावपातळीवरील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व समितीच्या संदस्यानी पुन्हा कार्यान्वित होण्याची गरज निर्माण झाली आहे.