◻आश्वी व जोर्वे गटातील कोव्हीड योध्दयाचां माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यानी केला सन्मान.
संगमनेर Live | कोव्हीड संकटात आपले पालक गमावलेल्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनेमुळे केंद्र सरकारची सामाजिक बांधिलकी दिसून आली परंतू या मुलांचे भविष्य घडण्यास मोठी मदत झाली असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केद्र सरकराला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोव्हीड योध्दयांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आश्वी आणि जोर्वे येथे कोव्हीड नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रातिनिधिक स्वरुपात प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, आरोग्य अधिकारी डॉ. तांबोळी, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पत्रकार संजय गायकवाड यांच्यासह आशा वर्कर, नर्सिंग स्टाफ आणि खासगी डाॅक्टरांना शाल आणि सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली खरे तर आनंदोत्सव साजरा व्हायला पाहीजे होता. पण तसे न करता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांनी सेवा ही संघटन या कार्यक्रमाचे देशभर आयोजन करून कोव्हीड योध्दयांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम शिर्डी मतदारसंघात आयोजित केला असल्याचे आ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
देशात कोव्हीड संकटाने थैमान घातले असताना पंतप्रधान मोदीनी अतिशय धैर्याने परिस्थितीवर मात केली. पहील्या लाटेत आत्मनिर्भर योजना जाहीर करून देशातील सामान्य माणसाला आधार दिला. आता दुसऱ्या लाटेत आॅक्सिजनसह आरोग्याची साधन त्यांनी उपलब्ध करून दिली. आपल्या संबधाचा उपयोग करुन इतर देशातूनही भारताला मदतीचे पुढे आलेले हात हे मोदीजींच्या द्रष्ट्या नेतृत्वाची साक्ष देत असल्याचे नमूद करून आ. विखे पाटील म्हणाले की, कोव्हीड संकटात आपले पालक गमावलेल्या मुलांसाठी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेमुळे या अनाथ मुलांचे भविष्य घडण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पहील्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने ग्रामीण भाग उध्वस्त झाला. रूग्णांची संख्या अचानक वाढली. रूग्णालय उपलब्ध होत नव्हते आशा परिस्थितीत ग्रामीण भागातील कोव्हीड योध्दयांनी उपलब्ध असलेल्या साधनातून अनेकांचे प्राण वाचवले. हे योध्दे होते म्हणूनच ग्रामीण भाग सुरक्षित राहू शकला संकटाचा धोका अद्याप कमी झालेला नसल्याने काळजी घेण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले.
याप्रसंगी जेष्ठ नेते बापुसाहेब गुळवे, विठ्ठलराव गायकवाड, भगवानराव इलग, रखमाजी खेमनर, रामभाऊ भुसाळ, अँड. रोहीणी निघुते, दिपाली डेगंळे, निवृती सांगळे, बाळासाहेब भवर, सतिष कानवडे, शिवाजीराव कोल्हे, दिलीप इंगळे, गोकूळ दिघे, सरपंच म्हाळू गायकवाड, डॉ. कोडांजी मदने, अँड. अनिल भोसले, विकास गायकवाड, इन्नुस सय्यद, पत्रकार सहदेव जाधव, सतीष जोशी, जेऊरभाई शेख, नारायण कहार, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार विनोद गंभिरे, प्राचार्य राम पवार, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जोर्वे येथील कोव्हीड केअर सेंटरची आ. विखे यांनी पाहाणी केली. या सेंटरला बिस्किटांचे बाॅक्स सेवा सप्ताहाच्या निमित्ताने देण्यात आले.
आ. विखे यांनी मांची येथील कोव्हीड सेंटरची पाहाणी केली. अँड. शाळीग्राम होडगर प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, डॉ. तांबोळी याप्रसंगी उपस्थित होते. या कोव्हीड सेंटरमुळे आश्वी आणि पंचक्रोशीतील गावांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे समाधान व्यक्त केले. या सेंटरसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बिस्किटांचे बाॅक्स देण्यात आले.