काकडी - नादुर्खी ते साकुरी रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी.

संगमनेर Live
0
आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांचा पाठपुरावा ; विमानतळाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार.

संगमनेर Live | काकडी - नादुर्खी ते साकुरी या ८ कि. मी. रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्‍या कामासाठी आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध झाल्‍याने या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून, विमानतळाकडे जाणारा हा मार्ग वाहतुकीकरीता सर्वासाठी लवकरच खुला होणार आहे.

उपलब्‍ध झालेल्‍या निधीतून नादुर्खी ते साकुरी या रस्‍त्‍याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण होणार असून, साकुरी ते राहाता या रस्‍त्‍याचे ९०० मिटर पर्यंतचे काम हे कॉक्रीटीकरणातून होणार आहे. नादुर्खी ते साकुरी या रस्‍त्‍याचे रुंदीकरण पुर्ण झाले असून, डांबरीकरणाचे कामही पुर्ण झाल्‍याने हा रस्‍ता वाहतुकीसाठी खुला होईल. साकुरी ते राहाता या मार्गाचे कॉक्रीटीकरण पुढील महीण्‍यात सुरु करणार असल्‍याचे अभियंता श्री. वर्पे यांनी सांगितले.

साकुरी गावाला जोडणारा हा रस्‍ता सकल भागातून जात असल्‍याने या मार्गाचे काम चांगल्‍या पध्‍दतीने आणि टिकाऊ होण्‍यासाठी कॉक्रीटीकरणातून करावा अशी सुचना आ. विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या आधिकाऱ्यांना केली होती. त्‍यानुसार रस्‍त्‍याच्‍या कॉक्रीटीकरणाच्‍या कामास प्रशासकीय मान्‍यता मिळाल्‍यानंतर अर्थसंकल्‍पातून ४ कोटी ५० लाख रुपयांच्‍या उप‍लब्‍ध निधीतून हे काम होत आहे. या सर्व रस्‍त्‍यांचे काम पुर्ण झाल्‍यानंतर शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरीकांसाठी वाहतूकीचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !