मांचीहिल कोविड सेटंर मुळे कोविड - १९ ची साथ आटोक्यात - अँड. रोहिनीताई निघुते

संगमनेर Live
0
◻ मांचीहिल कोविड सेंटर, आश्वी खुर्द व जोर्वे येथिल विलगीकरण कक्षाचे आ. विखे पाटील याच्याकडून कौतुक.

संगमनेर Live | आश्वी खुर्द, जोर्वे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या विलगीकरण कक्ष तसेच मांचीहिल येथिल कोविड सेटंरमुळे आश्वी पंचक्रोशीतील कोविड - १९ ची साथ आटोक्यात आणण्यात यश आले असून या केद्रांचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यानी कौतुक केले असल्याची माहिती आश्वी जिल्हा परिषद गटाच्या सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते यानी दिली आहे. तसेच रुग्ण संख्या कमी झाली असली तरी गाफील न राहता नियमाचे पालन करण्याच्या सुचना त्यानी केल्या.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द व जोर्वे येथिल विलगीकरण कक्ष तसेच मांचीहिल येथिल कोविड सेटंरला अँड. रोहिनीताई निघुते यानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मांचीहिल येथे डॉ. जाधव, सरपंच अमोल जोंधळे, आश्वी खुर्द येथे डॉ. कोडांजी मदने, ग्रामविकास अधिकारी लहानु फड, पत्रकार संजय गायकवाड, आरोग्य सेवक विकास सोनवणे, आ. विखे पाटील यांचे स्विय साहय्यक डॉ. संजय कहार, गणेश खेमनर, हरीष जोर्वेकर, अनिल गायकवाड, दिपक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते इन्नूस सय्यद, विकास गायकवाड, भारत म्हसे, पुरुषोत्तम भवर, जोर्वे येथे ग्रामविकास अधिकारी डॉ. राजेद्रं कोल्हे, उपसरपंच गोकूळ दिघे आदि उपस्थित होते. यावेळी तिनही ठिकाणी फळे व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले.

रोहिनीताई यावेळी म्हणाल्या की, कोरोनाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठे थैमान घातले असून आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शिबलापूर, पिप्रीं - लौकी अजमपूर, ओझर, शेडगाव, हंगेवाडी आदिगावानमधील नागरीकाचा मोठ्या संख्येने कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कडक नियम लागू केले. परंतू बाधीताची सख्या वाढत असल्याने साथ आटोक्यात आणण्यासाठी आश्वी खुर्द व जोर्वे ग्रामपंचायतीने स्थानिकाच्या मदतीने विलगीकरण कक्ष सुरु केले. यामुळे बाधीताकडून होणार संसर्ग थांबण्यात यश आले आहे. आश्वी खुर्द येथिल विलगीकरण कक्षात पहिल्या दिवशी ४५ बाधीत दाखल झाले होते. तर पंधरा दिवसानतंर विलगिकरण कक्षात केवळ आठ बाधीत उपचार घेत असल्याचे त्यानी नमूद केले. तर जोर्वे येथे भेट देऊन रुग्णाची माहिती घेऊन विलगीकरण कक्षातील उत्कृष्ट कामकाजाबद्दल कौतुक करत मार्गदर्शन व सुचना केल्या.

निमगावजाळी आरोग्य केद्रांअतर्गत डॉ. तय्यब तांबोळी याच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या मांचीहिल येथिल कोविड सेटंर मध्ये पंचक्रोशीतील आतापर्यंत किमान एक हजार बाधीत रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले असून याठिकाणी असलेले डॉक्टर, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्याची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे अँड. निघुते यानी भेटीप्रसंगी म्हटले आहे.

मांचीहिल कोविड सेटंर येथे अँड. शाळीग्राम होडगर हे नियमितपणे रुग्णाना दूध, अंडी, जेवण याची निस्वार्थ भावनेतून सेवा करत असून आश्वी खुर्द येथिल विलगीकरण कक्षातील रुग्णाना मागील पंधरा दिवसापासून लोकसहभागातून जेवन बनवून देणारे इन्नुस सय्यद यांचे विशेष कौतुक अँड. रोहिनीताई निघुते यानी आश्वी खुर्द येथिल भेटीप्रसंगी केले आहे. या कोविड सेटंर साठी निस्वार्थ भावनेतून राबणाऱ्या व मदत करणाऱ्याचे ही अँड. निघुते यानी कौतुक केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !