संगमनेर Live | कोरोना संकटातही तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम ठेवताना राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने वाडीवस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखली येथील चिखली- केरेवडी या आढळा नदीवरील ५० लाख निधीतून उभारल्या जाणार्या भव्य अद्यावत पुलाचे कामाचे भूमिपूजन नामदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
चिखली (केरेवाडी) रस्त्यावर आढळा नदीवर पुलाचे बांधकाम करणे (५० लक्ष) किमतीच्या कामाचे भूमिपूजन महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सदस्य निशाताई कोकणे, कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख, कारखान्याचे संचालक विनोद हासे, दुध संघाचे संचालक भास्करराव सिनारे, माजी उपसभापती नंदुपाटील हासे, रमेश गुंजाळ, अनिल काळे, सरपंच रविंद्र बर्डे, उपसरपंच रत्नमाला हासे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील आदिंसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नामदार थोरात म्हणाले की, तालुक्यातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देते विकास कामांचा वेग कायम राखला जात आहे. कोरोना संकटातही तालुक्यातील विविध रस्तेंच्या कामासाठी मोठा निधी मिळाला असून यातून दर्जेदार काम मार्गी लावली जात आहे. चिखली - केरेवाडी पुलामुळे या भागातील नागरिकांची दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. नवीन आधुनिक पद्धतीने अद्यावत व दर्जेदार फूल लवकरात लवकर उभारावा अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात हे राज्यात मोठी जबाबदारी सांभाळत आहे. मात्र तालुक्यातील १७१ गावे वाड्या वस्त्यावरील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ते अविरतपणे काम करत आहे. विकास कामांमुळेच आपला तालुका राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखला जात आहे. आगामी काळातही हाच विकासाचा वेग आपल्याला कायम ठेवायचा असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे म्हणाले की, धांदरफळ गटामध्ये नामदार थोरात, आ. तांबे व इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विविध रस्त्यांचे व अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहे. हा पूल चिखली करांसाठी वैभवशाली ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४५ लाख रुपयांच्या निधीतून आढळा नदीवर हा पूल तयार करण्यात येणार आहे. यामुळे चिखली व केरेवाडी सह या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.