◻ गावातील उच्चशिक्षित तरुणानी ‘ मनोली हेल्पिग हँड ’ या वाँटसअप ग्रुपच्या माध्यमातून दिला आधार.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात मागील अनेक दिवसापासून कोरोनाने थैमान घातले होते. परंतू सरकार व स्थानिक प्रशासनाने केलेल्या कडक उपाययोजनामुळे कोरोना बाधीताची संख्या घटत असून तालुक्यातील मनोली गावातील उच्चशिक्षित तरुणानी केलेल्या निर्धारामुळे गाव आता कोरोनामुक्तीकडे चालल्याचे आश्वासक चित्र निर्माण झाल्यामुळे या तरुणाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
मागील काही दिवसात मनोली गावात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे गावातील उच्चशिक्षित तरुणानी सोशमिडियातील मनोली हेल्पिग हँड ’ या वाँटसअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना मुक्तीचा निर्धार करुन ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या सहकार्यातून मोहिम सुरु केली. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्तें जिल्हापरिषद शाळेत विलगिकरन केंद्र सुरु केले. यावेळी इंदोरीकर महाराजानी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. या तरुणाना गावातील जेष्ठ व्यक्ती, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीकडून योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.
गावात बाधीत व्यक्ती आढळल्यानतंर त्या व्यक्तीला योग्य समुउपदेनश व मार्गदर्शन करत कोविड सेंटर मध्ये दाखल करणे, संपर्कातील व्यक्तीच्या चाचण्या व विलगिकरन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना बाधीत व्यक्तीच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम या ग्रचपच्या सदंस्याकडून केले जात आहे. तसेच गावातील नागरीकाचे लसीकरण व्हावे त्या दृष्टिकोणातून प्रयत्नं सुरू केले आहे. तर या विलगिकरन कक्षात दाखल झालेल्या बाधीत व्यक्तीच्या तपासणीचे सेवाभावी कार्य डॉ. प्रशांत भागवत हे दैनदिन करत आहे.
‘ मनोली हेल्पिग हँड ’ या वाँटसअप ग्रुपच्या माध्यमातून किराणा साहित्य, मास्क व सँनेटाइजर वाटपाचे आवाहन करण्यात आल्यानतंर स्वसेवकानी अर्थिक मदत देऊन वस्तूचे वाटप केले असून वेळोवेळी केलेले मार्गदर्शन तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजनामुळे मनोली गावाची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरु झाल्याने परिसरात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या तरुणानी सेवाभावी वृत्तीतून केलेल्या कामाची ग्रामस्थं कृतज्ञंता व्यक्तं करत आहे.
शिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेगावी असलेल्या असलेल्या तरुणानी २०१९ साली ‘ मनोली हेल्पिग हँड ’ या वाँटसअप ग्रुपची स्थापना करत गावातील तरुणाना स्वयंरोजगार, उद्योग, शिक्षण, पर्यावरण आदि बाबत ताजी माहिती व मार्गदर्शन करताना गावचे गावपण व माणसे जपण्याचे काम सुरु केले. कोरोना काळात ग्रुपच्या सदंस्या गावाला आधार दिला असून गावचे ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मीमाता मंदिरासमोर लहान मुलासाठी बगीचा उभारण्याचा मानस या तरुणानी व्यक्त केला आहे.