प्रातांधिकारी व तहसिलदाराच्या दणक्यानतंर आश्वी खुर्द येथे उपाययोजना सुरू.

संगमनेर Live
0
पोलीस संरक्षणात व्यापारी व व्यावसायिकाच्या रँपिड चाचण्या ; दोन बाधीत आढळले.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे कोविड - १९ चा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून गावातील अनेक नागरीकाचा कोरोनाने बळी जात असल्याने गुरुवारी प्रातांधिकारी व तहसिलदारानी आश्वी खुर्द येथे अचानक भेट देऊन उपाययोजनाची पाहणी करुन सुचना केल्या. त्यामुळे सध्या संसर्ग मंदावला असला तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी म्हणून गावातील लहान मोठे व्यापारी व व्यावसायिकाच्या रँपिड अँटिजन चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे.

आश्वी खर्द येथिल मागील काही दिवसात संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गावात विलगिकरन कक्ष उभारण्यात आला असून सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधीताना विलगिकरन कक्षात दाखल करत उपचार करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस आश्वी खुर्द येथे रुग्ण संख्या तसेच मृत्यूदर वाढत असल्याने गुरुवारी अचानकपणे प्रातांधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिदें, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप, चौधरी आदिनी आढावा घेऊन चाचण्या वाढवण्याच्या सुचना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला केल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी पोलीस संरक्षणात ६१ नागरीकाच्या रँपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये दोन बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर घरोघरी जाऊन चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शुक्रवारी घेण्यात आलेल्या चाचण्यासाठी आरोग्य विभागाचे विकास सोनवणे, कैलास भुसाळ, सुरेश पगारे, नरेंद्र पोरे, शिल्पा चिखले उपस्थित होते त्याना सुयोग सोनवणे यानी मदत करत सहकार्य केले. याप्रसंगी सरपंच म्हाळू गायकवाड, ग्रामविकास अधिकारी लहानु फड, कामगार तलाठी भालचिम, उपसरपंच सुनिल मांढरे, पत्रकार संजय गायकवाड, प्रशांत कोडोंलिकर, विकास गायकवाड, उमेश सालकर, गणेश साबळे, दिपक मुन्तोडे, अमोल मुन्तोडे, तुषार गायकवाड, माणिक भवर, विकास गायकवाड, मोहित गायकवाड, इन्नुस सय्यद, संतोष भडकवाड, पुरुषोत्तम भवर, आदिनाथ जाधव तसेच पोलीस प्रशासनातील हवालदार विनोद गंभिरे, निलेश वर्पे, होमगार्ड दत्तात्रय सुळ आदि उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !