◻ सर्वसामान्य रुग्णाची ससेहोलपट थांबणार ; कोविड - १९ च्या संकटकाळात परिसरातील १८ गावाना दिलासा.
संगमनेर Live | सध्या करोना संसर्गाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत, असे प्रकारही पाहायला मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केद्रांला जिल्हापरिषदेकडून नुकतीच रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली असून जिल्हापरिषद संदस्या अँड. रोहिनीताई निघुते व इंद्रजित थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहिकीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, विखे कारखाण्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, उपसभापती नवनाथ आरगडे, भगवानराव इलग, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, मच्छिंद्र थेटे, सरपंच अमोल जोंधळे, अनिल डेंगळे, भाऊसाहेब डेंगळे, नंदकुमार वदक, स्वाती मोरे, सोमनाथ जोंधळे, गोकुळ दिघे, आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी, डॉ. महेजबीन तांबोळी, मेजर खताळ आदिसह कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कोविड - १९ च्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याने उपस्थितीत मान्यवरानी डॉ. तांबोळी व त्याच्या सहकार्याचा संत्कार केला आहे.
सध्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना व उपलब्ध जीर्ण रुग्णवाहिकेवर ताण आला असल्यामुळे निमगावजाळी आरोग्य केद्रांला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा मोठा फायदा आरोग्य केंद्राअतर्गत येणाऱ्या १८ गावाना व आरोग्य यंत्रणेला होणार आहे. जिल्हापरिषदेने दिलेल्या रुग्णवाहिकेत सर्व सुविधा उपलब्ध करुन रुग्णांना विनाविलंब उपचार मिळणार असल्याने आरोग्य विभागाच्या कोरोना हद्दपार करण्याच्या प्रयत्नाना यामुळे बळकटी मिळणार असल्याची माहिती डॉ. तय्यब तांबोळी यानी दिली आहे.
दरम्यान रुग्णवाहिकांची वाढती मागणी असल्यामुळे खासगी रुग्णवाहिका मालकाची मुजोरी वाढली असल्याने या रुग्णवाहिकेमुळे परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे.
निमगावजाळी आरोग्य केंद्राअतर्गत असलेल्या अनेक गावामध्ये आरोग्य सुविधा बेताची असून उपचारासाठी येथिल नागरीकाना संगमनेर अथवा लोणीला जावे लागत असते. निमगावजाळी आरोग्य केंद्राला जिल्हापरिषदेने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरीकानी समाधान व्यक्त केले आहे.