संगमनेर Live (नवी दिल्ली) | बुधवारी करोनामुळे ६१४८ जणांचा मृत्यू झाला असून आजवरचा एका दिवसतला सर्वाधिक करोना मृत्यूचा आकडा ठरला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या आता ३ लाख ५९ हजार ६७६ च्या पुढे पोहचली आहे.
गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात बुधवारी (९ जून) ९४ हजार ०५२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ६१४८ जणांचा मृत्यू झाला. हा आतापर्यतचा एका दिवसतील सर्वाधिक करोना मृत्यूचा आकडा आहे.
देशाचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के असून सलग तिसऱ्या दिवशी भारतात एक लाखांहून कमी करोनाबाधितांची नोंद झाली आहे. बुधवारी १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
देशातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ वर पोहचली आहे. देशात आत्तापर्यंत २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू असून देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ५९ हजार ६७६ च्या पुढे गेली आहे.
आतापर्यत देशभरात २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ करोना संक्रमित रुग्ण आढळले असून २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ११ लाख ६७ हजार ९५२ रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर ३ लाख ५९ हजार ६७६ जणाचा मृत्यू झाला आहे.
१ जून रोजी ३२०७, २ जून रोजी २८८७, ३ जून रोजी २७१३, ४ जून रोजी ३३८०, ५ जून रोजी २६७७, ६ जून रोजी २४२७, ७ जून रोजी २१२३, ८ जून रोजी २२१९ तर ९ जून रोजी ६१४८ कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.